• Home
  • सीबीएसई दहावी, बारावी: परीक्षा केंद्रांत पाचपट वाढ

सीबीएसई दहावी, बारावी: परीक्षा केंद्रांत पाचपट वाढ

⭕सीबीएसई दहावी, बारावी: परीक्षा केंद्रांत पाचपट वाढ⭕
मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)

देशात करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या जुलै महिन्यात होणाऱ्या परीक्षांसाठी नियमित परीक्षा केंद्रांसोबत अधिकची दीड हजार परीक्षा केंद्रे वाढविण्यात येणार आहेत. सीबीएसईच्या परीक्षेत प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित वावराचा नियम पाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करून दिली आहे.

देशभरातील सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वी तीन हजारांच्या दरम्यान परीक्षा केंद्रे होती. त्यात वाढ करण्यात आली आहे. तसेच, विद्यार्थ्यांना आपल्याच शाळांमध्ये ही परीक्षा देता येणार आहे. यापूर्वी बऱ्याच ठिकाणी परीक्षा केंद्रे दूर-दूर होती, ती अडचणही यामुळे कमी होणार असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्र्यांनी म्हटले आहे. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १ ते १५ जुलै या कालावधीदरम्यान घेतल्या जाणार आहेत.

विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांचे तळ्यात मळ्यात

रेल्वे, टीएमसी, बँक…सर्व भरतींची माहिती एका क्लिकवरदेशभरात लॉकडाउनच्या काळात राहिलेल्या सर्व पेपरच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. यात दहावीचे चार पेपर शिल्लक राहिले हेाते, त्यात समाजशास्त्र, विज्ञान, हिंदी, इंग्रजी संभाषण या पेपरांचा समावेश आहे. तर, बारावीचे तब्बल विविध विभागांतील २३ पेपर शिल्लक राहिले आहेत. त्यात राष्ट्रीय स्तरावरील आणि विभागीय स्तरावरील पेपरचा समावेश आहे. यात होम सायन्स, रसानशास्त्र, बिझनेस स्टडी, बायो टेक्नॉलॉजी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, गणित, अर्थशास्त्र, इतिहास आदी विषयांचा समावेश आहे. त्यामुळे सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर सुरक्षित वावराचा नियम पाळता येणार आहे. यापूर्वीच सीबीएसईने देशातील सर्व परीक्षा केंद्रांत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्यासोबत सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक, चांगल्या दर्जाचा मास्क घालणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अंतर ठेवण्याचे आदेश दिले होते…

anews Banner

Leave A Comment