
आशाताई बच्छाव
आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे 04 इसमावर स्थागुशा जालना यांची कार्यवाही
जाफराबाद जालना प्रतिनीधी- मुरलीधर डहाके
27/03/2025
सविस्तर वृत्त असे की आय पी एल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे व बुकिवर कायदेशीर कार्यवाही करणेबाबत मा. अजय कुमार बंसल साहेब यांनी सूचना दिल्या होत्या .
त्यावरून अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी यांचे मार्गदर्शनाखाली अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी जालना , श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी कार्यवाही करणेबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने जालना शहरातील पोलीस ठाणे सदर बाजार हद्दीत आयपिएल क्रिकेट मॅचवर सट्टा लावनारे व यांची माहिती काढून इसम नामे धवल किरीटकुमार शहा रा. सकलेचा नगर , व रोहीत क्षिरसागर रा. मोदीखाना जालना हे त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्स ॲप व फोन कॉल वरून बुकी नामे शुभम मुदिराज , रोहीत गोरक्ष यांचेकडे आयपीएल क्रिकेट मॅच कोलकोत्ता विरूद्ध राजस्थान या क्रिकेट मॅच वर ऑनलाईन सट्टा लावतांना मिळून आल्याने त्यांचेकडून 02 मोबाईल व नगदी रक्कम असा एकूण 40050/- रूपये किंमती चा मुद्देमाल जप्त करून पोलिस्टेशन सदर बाजार जालना येथे कायदेशीर फिर्याद देण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल साहेब, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, श्री अनंत कुलकर्णी उप विभागीय पोलीस अधिकारी जालना यांचे मार्गदर्शनाखाली श्री पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थागुना जालना, श्री योगेश उबाळे, सपोनि. पोलीस अमलदार सॉम्युअल कांबळे , रामप्रसाद पव्हरे , फुलचंद गव्हाणे, सुधीर वाघमारे ने स्थागुशा जालना यांनी केली आहे.