आशाताई बच्छाव
जाफराबाद येथे स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणी साठी सर्व पक्षीय बंद पाळण्यात आला.
जाफराबाद तालुका प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 5/3/2025.
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद येथे 5 मार्च रोजी बुधवार या दिवशी स्वर्गीय संतोष भाऊ देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठीच जाफराबाद येथे सर्व पक्षीय बंद ठेवण्यात आला होता. आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी जाफराबाद शहर आणि सर्व पक्षीयांनी केली आहे. जर आरोपींना फाशीची शिक्षा झाली नाही तर आणखी मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सर्व पक्षियांनी दिला आहे. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंद कडकडीत पळण्यात आला होता.
बंद शांततेत पार पडावा या साठी जाफराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्टॉप यांनी बंद शांततेत पार पडावा आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता.