आशाताई बच्छाव
चालकासह मोटारसायकल कन्नड घाटात कोसळली –
महामार्ग पोलीसांनी जखमीला काढले वर..
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – कन्नडकडून शिवापूर चाळीसगावकडे येणार्या मोटारसायकल चालकाचे नियंत्रण सुटल्याने चालक मोटारसायकल सह कन्नड घाटात 300 फुट खोल दरीत पडल्याची घटना दि 5 रोजी दुपारी 1-30 वाजेच्या सुमारास घडली होती .
या घटनेची माहिती महामार्ग पोलीसांना मिळताच
सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, हवालदार योगेश पवार, शेषराव राठोड, संदीप जगताप यांनी खोल दरीत जावून हवालदार योगेश पवार यांनी या जखमी दुचाकीस्वाराला खांद्यावर उचलत घाट चढून वर आणून त्यास रूग्णालयात उपचारार्थ रवाना केले.
घटनेची माहिती अशी की, गोरख शिवराम राठोड (48) हा व्यक्ती कन्नडकडून शिवापूर चाळीसगावकडे त्याची मोटारसायकल MH-52 A-1075 ने येत असतांना कन्नड घाटात मेणबत्ती पॅाईंटजवळ त्याचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटले व तो मोटारसायकल सह 300 फूट खोल दरीत कोसळला होता.