आशाताई बच्छाव
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने केला अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव ने १६ अग्निशमन कर्मचाऱ्यांचा सन्मान केला
सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी सौरभ जोशी व अग्निशमन अधिकारी अक्षय घुगे उपस्थित होते.
या सन्मानाने आमच्या अग्निशमन दलाचे मनोबल नक्कीच उंचावेल तसेच आग, भूस्खलन, पूर, रेल्वे अपघात यासह विविध आपत्ती दरम्यान तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा यात आहे तसेच कुठे अपघातात वाहने अडकली तर त्यासाठी कटर ची सुविधा देखील या वाहनात उपलब्ध असून गस्तीसाठी देखील या अत्याधुनिक वाहनाचा उपयोग होतो असे सौरभ जोशी व अक्षय घुगे यांनी सांगितले.
यावेळी ईश्वरलाल पाटील, बापूराव ठाकूर, संदीप देशमुख चंद्रकांत राजपूत कपिल पंगरे, ज्ञानेश्वर चौधरी, विजय चौधरी शशिकांत चौधरी, रमेश राठोड, संदेश पाटील, राहुल राठोड रणजीत जाधव, सागर देशमुख, नितीन खैरे, रितेश देशमुख व विशाल मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अनिल मालपुरे यांनी केले .
यावेळी किरण देशमुख, प्रितेश कटारिया, राजेंद्र पाटील चंद्रेश लोडाया, सौ पूजा मालपुरे, सौ मनीषा मालपुरे, सौ विजया मालपुरे, श्रीकांत मोरकर, निलेश ढोले, पंकज पिंगळे, मंदार चिंधड़े, सुनील वाणी, राजेंद्र कटारिया, बलदेव पुंशी, राकेश बोरसे व सुनील मालपुरे उपस्थित होते.
सूत्रसंचलन डॉ. रवींद्र निकम व बाळासाहेब सोनवणे यांनी केले. आभार निलेश शर्मा यांनी मानले.