Home जालना पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची गोंदी पोलीस ठाण्याची वार्षिक पाहणी

पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची गोंदी पोलीस ठाण्याची वार्षिक पाहणी

42
0

आशाताई बच्छाव

1001270734.jpg

पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा यांची गोंदी पोलीस ठाण्याची वार्षिक पाहणी
जाफराबाद जालना प्रतिनिधी- मुरलीधर डहाके
दिनांक 25/02/2025

दि.२४फेब्रुवारी रोजी गोंदी पोलीस स्टेशन येथे छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री वीरेंद्र मिश्र यांनी वार्षिक तपासणी कामी भेट दिली. भेटीमध्ये गोंदि पोलिसांची मानवंदना स्वीकारून गोंदी पोलिसांच्या वर्षभराच्या कामगिरीचा आढावा, तसेच पोलीस स्टेशन नी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत गोंदी पोलिसांचे कौतुक केले तसेच सर्व पोलीस अंमलदार यांच्याशी सैनिक संमेलनातून संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच संपूर्ण इमारतीची परिसराची व पोलीस स्टेशनला उपलब्ध असलेल्या सर्व रेकॉर्डची पाहणी केली. वार्षिक तपासणी दरम्यान जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड श्री विशाल खांबे, गोंदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आशिष खांडेकर. उप निरीक्षक इब्राहिम शेख.व गोंदी पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ हजर होता. तपासणी दरम्यान माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांच्याशी संवाद साधला व त्यांनी प्रथम फेस फाउंडेशनच्या माध्यमातून तरुणांना मिळून दिलेल्या रोजगाराचे अनुषंगाने केलेल्या कामगिरीचे देखील कौतुक केले.

Previous articleसदर बाजार डिबी पथका ची कार्यवाही एका तरुणांकडून धारदार तलवार तसेच एकांकडून एक धारदार खंजीर जप्त.
Next articleघानखेडा येथील संगमेश्वर महादेव मंदिरा समोर रांगोळीतून भगवान शंकराचे चित्र
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here