Home जळगाव चाळीसगाव येथे हॉटेल मधून गावठी पिस्टल व काडतूस सह एकास अटक

चाळीसगाव येथे हॉटेल मधून गावठी पिस्टल व काडतूस सह एकास अटक

129
0

आशाताई बच्छाव

1001270639.jpg

चाळीसगाव येथे हॉटेल मधून गावठी पिस्टल व काडतूस सह एकास अटक

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शहरातील स्टेशन रोडवरील एका हॉटेल मध्ये बसलेल्या राहता तालुक्यातील 21 वर्षीय तरुणास चाळीसगाव शहर पोलिसांनी गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतूस सह ताब्यात घेतले असून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहरातील हॉटेल विराम परमिटरूम बार मध्ये एक तरुण गावठी पिस्टल घेवून बसला असल्याची गोपनीय माहिती गस्तीवर असलेले उपनिरीक्षक संदीप घुले यांना मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोबतच गस्तीवर असलेले
पोहेकॉ. योगेश बेलदार, राकेश पाटील, अजय पाटील, पोलीस नाईक नितीन आगोणे व पोकॉ. निलेश पाटील यांनी दि 24/2/25 रोजी दुपारी हॉटेल मध्ये जाऊन सापळा रचून त्यास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव किरण कैलास गायकवाड (वय-21 वर्षे, मुळ राहणार – संवसर, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर, सध्या – शिर्डी बायपास, खंडोबा मंदिर जवळ, ता. राहता, जि. अहिल्यानगर) असे सांगितले त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळून 32 हजार रुपये किमतीची 1 गावठी पिस्टल व 2 जिवंत काडतूस हस्तगत करून त्यास ताब्यात घेतले असून त्याचे विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 58/2025 अन्वये भारतीय हत्यार प्रतिबंध कायदा कलम 3, 7 व 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleनांदेड जिल्ह्यात ज्ञान गंगा व जगण्याचा मार्ग पुस्तकाचे वितरण
Next articleआमदार संतोष पाटील दानवे यांची पंचायतराज समिती, च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भोकरदन येथे जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here