आशाताई बच्छाव
उदगीर शहरात सुरु असलेल्या अंडरग्राउंड ड्रेनेज काम थांबवा अन्यथा रास्ता रोको आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा
प्रतिनिधी | उदगीर लातुर
उदगीर शहरात १६२ कोटी रुपये खर्च करुन पहिल्या टप्यातील २७ डिसेंबर २०२४ रोजी सुरू झालेले काम थांबवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने सोमवारी (१७ फेब्रुवारी) उदगीर उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्याकडे करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उदगीर न. प. अंतर्गत नाली आणि रोडसाठी मोठ्या प्रमाणात दलित वस्ती, नगरोत्थान, वैशिष्ट्यपूर्ण तसेच वित्त आयोगाचा निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला असून त्या कामाची निविदा नगर पालिकेने काढले असून त्या कामांना सुरूवात झाली आहे. काही कामाच्या कार्यारंभ होत आहेत परंतु त्याचबरोबर शहरामध्ये वॉटर ग्रीड अंडरग्राउंड नालीचे काम पण चालू झालेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोड फुटणार आहेत याची जाणीव कदाचित न.प. च्या बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना झाली नसावी. कारण न.प. उदगीर यांनी अंडरग्राउंड नालीचे काम कोणत्या भागात किती किमी आहे किंवा शहराच्या कोणत्या भागात अंडरग्राउंड नाली होणार आहे याचा आराखडा न.प. ने जाहीर केला नाही. एकीकडे मोठ्या प्रमाणात शहरात नवीन कामे चालू केली जात आहेत. त्यामुळे आलेला निधीचा मोठ्या प्रमाणात संबंधीत अधिकारी भ्रष्टाचार करीत आहेत. यामुळे सरकारी पैशाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे संबंधीत सर्व नवीन कामाला स्थगिती द्यावी.
देऊन अंडरग्राउंड नाली बांधकामास तरी स्थगिती सरकारच्या पैशाचा दुरुपयोग थांबविण्यात यावा,अन्यथा रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्यध्यक्ष गजानन सताळकर यांच्यासह धनाजी बनसोडे, संदीपान कदम, नामदेव भोसले,रत्नदीप कांबळे,प्रेम तोगरे,अभिनव गायकवाड,केशव कांबळे,माधव उदगीरकर आदी कार्यकर्ते यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.