आशाताई बच्छाव
पद्मशाली महासभेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षपदी उषा बोडेवार
अतनूर लातूर / प्रतिनिधी
अखिल भारत पद्मशाली संघम समाज संघटना हैद्राबाद संलग्न मराठवाडा पद्मशाली समाज संघटना महासभेची रविवारी सकाळी ११ वाजता अतनूर ता.जळकोट येथे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास नक्का, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ.निर्मलाताई शिवाजी तम्मलवाड अतनूरकर यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठकीत लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतनूर येथे सर्व प्रौढ महिला व युवक तालुकाध्यक्षांची निवड करण्यात आली. प्रौढ अध्यक्षपदी गोपीनाथ काशिनाथ बोडेवार तर प्रौढ युवक अध्यक्षपदी काशिनाथ विठ्ठल तम्मलवाड आणि महिला अध्यक्षपदी अतनूरच्या माजी सरपंच सौ.उषा रमेश बोडेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या बैठकीत युवा अध्यक्षपदी काशिनाथ विठ्ठल तमलवाड, उपाध्यक्षपदी सूर्यकांत नागनाथ बोडेवार, सचिव गुंडू बाबुराव बोडेवार, सहसचिव संभाजी तुळशीराम तमलवाड, कोषाध्यक्ष ऋषिकेश बालाजी बोडेवार, सदस्यपदी सचिन बालाजी बोडेवार, संतोष पंडित भंडारे, धोंडीराम चंदर बोडेवार तसेच प्रौढ अध्यक्षपदी गोपीनाथ गणपती बोडेवार, उपाध्यक्ष अशोक नारायण बोडेवार, सचिव शिवाजी गणपती बोडेवार, सहसचिव बालाजी विठ्ठल बोडेवार, कोषाध्यक्ष सुभाष नागनाथ बोडेवार, सदस्य मारोती गणपती बोडेवार, विठ्ठल राम बोडेवार, पंडित लिंगराम भंडारे तसेच महिला आघाडीच्या जळकोट तालुका अध्यक्षपदी सौ.उषा रमेश बोडेवार, उपाध्यक्ष सौ.रेखा दत्तात्रय बोडेवार, सचिव सौ.सुजाता राम बोडेवार, सहसचिव सौ.रेखा बालाजी बोडेवार, कोषाध्यक्ष सौ.रेणुका सूर्यकांत बोडेवार, सदस्यपदी सरस्वती माधव तमलवाड, मुक्ता रघूनाथ बोडेवार, अनिता संभाजी बोडेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी यांना निवडीचे पत्र देऊन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आरोग्य विस्तार अधिकारी शिवाजी रामचंद्र तम्मलवाड, माजी सरपंच रमेश विठ्ठल बोडेवार, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक गणेश रामचंद्र तम्मलवाड, बालाजीराव तम्मलवाड, तसेच समाजातील बंधू भगिनी प्रमाणात मोठ्या संख्येने उपस्थित होते.