Home भंडारा विशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

विशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

38
0

आशाताई बच्छाव

1001264877.jpg

विशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप

पवनी तालुक्यातील ग्रामपंचायत पालोरा (चौ) येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 चा शुभारंभ

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तालुक्यातील ग्रामपंचायत पालोरा चौ/ च्या वतीने सार्वजनिक सभामंडप आंबेडकर वार्ड पालोरा येथे प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 टप्पा 2 अंतर्गत 75 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आज दि. 22 फेब्रुवारी 2025 ला विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून मा. ना. अमितभाई शाह, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांच्या शुभहस्ते व ना.देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महा आवास अभियान 2024-25 अंतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2” अंतर्गत 20 लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र व 10 लक्ष लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाचा कार्यक्रम दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 04.45 वाजता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजित केला आहे. आज ग्रामपंचायत पालोरा चौ च्या वतीने आंबेडकर वार्ड सार्वजनिक सभामंडप येथे प्रधानमंत्री आवास योजना 2024-25 टप्पा 2 अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करणे व पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम आज दि. 22 फेब्रुवारी 2025 ला विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यात ज्यांना घरकुल मंजूर आहे अशा लाभार्थ्यांच्या घराचे भूमिपूजन व ज्या लाभार्थ्यांचे घरकुल यशस्वीरित्या पूर्ण झाले अश्या लाभार्थीचे गृह प्रवेश आज करण्यात आले.यावेळी सरपंच शिशुपाल रामटेके, उपसरपंच प्रवीण खोपे, ग्रामसभा सचिव मुख्याध्यापिका ढबाले मॅडम, सूत्र संचालक शिक्षकरामचंद्र धारगावे , ग्रा. सदस्य,बालाराम वैद्य, श्री.संजय ठवरे,रामचंद्रजी गिऱ्हेपूजे ग्रामपंचायत सदस्या ज्योती गिऱ्हेपुंजे, रत्नमाला गिऱ्हेपुंजे,कविता धाबेकर,सविता काजरखाणे लेझीमा गोस्वामी,ग्रामविकास अधिकारी श्यामकुमार बिलवने पोलिस पाटील श्रीहरी गिऱ्हेपूजे, यशवंतराव धाबेकर,हरिदास सुपारे,विनायकराव फुंडे, देवानंद खोपे,पुरुषोत्तमजी गिऱ्हेपूजे,किशोर शहारे, शीतल भुरे कृषी सहाय्यक ,महेशजी चोपकर महसूल सेवक ,संगीताताई गिऱ्हेपूजे दुर्गाताई कावळे,वसंतराव फुंडे,देवचंद साठवणे ,कैलास दिघोरे श्री.देवराम कावळे,ताराचंद गिऱ्हेपूजे, सुनीता मस्के,ईश्वरी गिऱ्हेपूजे,रोजगार सेवक रवीजी खोपे व गावातील घरकुल लाभार्थी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमादरम्यान आयोजित ग्रामसभेत ग्रामपंचायत स्तरावरून घरकुल लाभार्थ्या समवेत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे कार्यक्रम उपस्थितानी बघितला. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व गृह मंत्री अमित भाई शाह तसेच राज्याचे ग्रामविकास मंत्री यांनी दिलेला शब्द पूर्ण करीत गोरगरिबांना त्यांच्या हक्काचे निवासस्थान मिळवून दिल्याने प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत प्राप्त घरकुल लाभार्थ्यांनी एक सुखद आनंद व्यक्त करीत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे यावेळी लाभार्थ्यांनी आभार मानले.

Previous articleविशेष ग्रामसभेत 75 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप
Next articleअखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेनेच्या वतीने सामाजिक न्याय मंत्र्यांना मागण्यांचं निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here