आशाताई बच्छाव
माहोरा ग्रामसंसद कार्यालय येथे संत गाडगे बाबा महाराजयाची जयंती साजरी
जाफराबाद जालना प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 23/02/2025
माहोरा ग्रामसंसदेत काल दी.23 वार रविवारी संत गाडगे बाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात ग्रामस्थांनी संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा आणि समाजसुधारणा कार्याचा स्मरण केलें .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीमध्ये संत गाडगे बाबा महाराज यांच्या प्रतिमेस सरपंच गजानन लहाने यांनी हार अर्पण करून संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा आदर करून ग्रामविकासासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जेष्ठ नेते भगवानराव लहाने यानी संत गाडगे बाबा महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी गावातील तरुण पिढीला प्रेरणा देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात जेष्ठ नेते भगवानराव लहाने,सरपंच गजानन लहाने,ग्रा.सदस्य प्रभाकर नाना शहागडकार,सुभाष लहाने , शिवाजी वाघ,ग्रा.स.चांदुभाऊ शिरसाठ,जुलालशिंग सोळंके,पत्रकार गव्हले,प्रकाश शिरसाट.अमोल लहाने ग्रामपंचायत कर्मचारी लक्ष्मण वाघ, गणेश गायकवाड व गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
संत गाडगे बाबा महाराज यांच्या शिकवणुकींचा पाठपुरावा करून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या संकल्पाने हा कार्यक्रम संपन्न झाला.