आशाताई बच्छाव
मुक्रमाबाद येथील कै.डॉ.भा. देशमुख विद्यालय परिक्षा केंद्रावर १० वी च्या परीक्षा सुरळीत
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय मुक्रमाबाद येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी (१० वी) २०२५ दि.२१ फेब्रुवारी रोजी बोर्डाच्या परीक्षेला प्रारंभ झाला असुन मराठी भाषेचा पहिला पेपर सुरळीतपणे पार पडला.यावेळी पेपर सुरू होण्याआधी पालकांनीही परिक्षा केंद्राच्या गेटवर हजेरी लावली होती गोजेगाव सावरमाळ, आमदापुर मुक्रमाबाद येथील कै. डॉ. भाऊसाहेब देशमुख विद्यालय केंद्र क्र.५२३७ या केंद्रावर १३ ब्लॉग मधुन एकूण ३१९ पैकी ३०८ विध्यार्थी परीक्षा दिले तर ११ विध्यार्थी अनुपस्थित होते. यावेळी बाराहाळी येथील पंचगट्टे अशोक सर हे केंद्र संचालक म्हणून उपस्थित होते तर बैठे पथकात शेळके जी.बी, शिंदे एम.डी, पांचाळ एम.एस,रनर म्हणून भाकरे,पांढरे,उपस्थित होते केंद्र साह्यक म्हणून जाधव के.व्हि, पिंजारी अल्ताफ हे काम पाहिले तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सा.पो.नि. भालचंद्र तिडके साहेब व पोलीस उपनिरीक्षक केंद्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गृहरक्षक दलाचे महीला पुरुष कर्मचा-यांनी चोख बंदोचस्त ठेवला होता.