आशाताई बच्छाव
पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांचीेफेरनिवड
शहराध्यक्षपदी सुहास वैद्य तर शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती
जालना । प्रतिनिधी दिलीप बोंडे- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पीसीएमच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक शेळके यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर शहराध्यक्षपदी सुहास वैद्य व शहर सरचिटणीसपदी शेख ईस्माइल यांची नियुक्ती करण्यात आली असून फेरनिवड व नियुक्तीचे पत्र राज्य सरचिटणीस महेश जोशी व विजयकुमार सकलेच्या यांच्या हस्ते देण्यात आले.
गेल्या तीन वर्षातील पीसीएमच्या जालना जिल्ह्यातील कार्याची दखल घेत पुन्हा दीपक शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. त्यांच्या मागील कार्यकाळात पीसीएमच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले. पत्रकार व वृत्तपत्रांच्या मागण्या शासन दरबारी लावून धरण्यात आल्या. विविध आंदोलने त्यांच्या नेतृत्त्वात केल्या गेली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ढोल बजाओ आंदोलनही त्यांच्या नेतृत्त्वात करण्यात आले. जिल्ह्यातील विविध पत्रकारांसह इतर संघटनांच्या प्रमुखांना सोबत घेऊन त्यांनी जिल्हा कृती समिती तयार करून विविध प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
त्यांच्या फेरनिवड व नियुक्तीबद्दल दीपक शेळके, सुहास वैद्य व शेख ईस्माइल यांचे माजी आ. कैलास गोरंट्याल, शेख माजेद, दत्ता घुले, महेश जोशी, विजयकुमार सकलेचा, ज्ञानेश्वर ढोबळे, धनसिंह सुर्यवंशी, भरत मानकर, विष्णु कदम, गणेश काबरा, दर्पण सकलेचा, शेख उमर, संदीप भाकरे, शेख नबी सिपोराकर, नरेंद्र जोगड, बद्री उपरे, संतोष भुतेकर, बाबासाहेब गाडेकर, योगेश पिछाडे, राहुल भालके, आनंद जाधव, उमेश केंधळे, मनोज घडे यांच्यासह पत्रकारबांधवांनी अभिनंदन केले आहे.