आशाताई बच्छाव
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती “जालना “जिल्ह्य़ातील पदाधिकार्यांचा मेळावा संपन्न
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 20/02/2025
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत राव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जालना येथे संप्पन झाला.
या वेळी उद्घाटक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा उपस्थित होते. आपल्या भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष बाबा यांनी संघटनात्मक बांधणी वर जास्त जोर दिला,जे पदाधिकारी संघटनेचे कार्य करीत नाहीत त्यांची पदे रद्द करण्यात येणार आसल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच जिल्हाध्यक्ष यांनी 31 मार्च पर्यंत आपल्या जिल्ह्य़ातील सर्व तालुक्यात संघटनेची बांधणी करावी अशा सूचना राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्या.जे पदाधिकारी कार्य करीत नाहीत त्यांची पदे रद्द करण्याची शिफारस जिल्हाध्यक्षांनी प्रदेश कार्यकारिणी कडे करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.ज्या जिल्ह्यातील पदाधिकारी काम करणारं नाहीत अशा जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त करण्यात येणार असल्याचेही राष्ट्रीय अध्यक्षांनी यावेळी सांगितले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहुन गोरगरीब जनतेची होत असलेली फसवणूक वेळीच थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी यावेळी उपस्थित, समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले. ग्रामीण भागातील तलाठी मंडळ अधिकारी ग्रामसेवक मुख्यालय राहत नसल्याने ग्रामीण जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यांची कोणतीच कामं वेळेवर होत नाही व गोरगरीब जनतेला विनाकार तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तलाठी ग्रामसेवक व मंडळ अधिकारी यांना पैसे देऊन कामे करून घ्यावी लागतात त्यामुळे गोरगरीब जनतेची आर्थिक फसवणूक होत असुन हि फसवणूक त्वरित थांबविण्यासाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न करून भ्रष्ट तलाठी मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांना भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या स्टाईलने जाब विचारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन वसंतराव देशमुख यांनी यावेळी केले आणि जर ही मंडळी प्रेमाने ऐकत नसतील तर माहितीच्या अधिकारामध्ये त्यांना माहिती विचारण्यात यावी व वरिष्ठांकडे यांची तक्रार करावी अशा प्रकारच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये कमालीच्या भ्रष्टाचार वाढला असून कुठलाच शासकीय अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य जनतेची कामे आर्थिक देवाण-घेवाण केल्याशिवाय करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले आहे अशा अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना लाच लुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे त्यांची तक्रार करून त्यांना धडा शिकविण्याची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जालना जिल्हा संपर्कप्रमुख माजी सैनिक सुनील नरवाडे यांचा सत्कार राष्ट्रीय अध्यक्ष माननीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतरावजी देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मा. श्री मुरलीधर जी डहाके जिल्हाध्यक्ष कृष्णाजी लहाने, जिल्हा संपर्कप्रमुख मा. सुनीलजी नरवाडे, जिल्हा संघटक आनीस पठाण, जाफराबाद तालुका अध्यक्ष रामदासजी कदम, भोकरदन तालुकाध्यक्ष मा.बालासाहेब देशमुख,भोकरदन तालुका उपाध्यक्ष सुनील उंबरकर, जालना जिल्हा उपाध्यक्ष शालिग्राम आहेर ,जालना जिल्हाध्यक्षा महिला विभाग ज्योती बोर्डे ,जालना जिल्हा अध्यक्ष दिव्यांग विभाग बबन लहाने.श्री नरवाडे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी झाले होते.