आशाताई बच्छाव
माहोरा येथे श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळा येथे शिवजयंती साजरी
दिनांक 21/02/2025
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
माहोरा, येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा. आश्रम शाळा, माहोरा येथे दिनांक 19 फेब्रुवारी बुधवार दिवशी शिवजयंती उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली. सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री सिनगारे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या प्रसंगी शाळेतील बरेचसे विद्यार्थी हे छत्रपती तसेच माँसाहेब जिजाऊंची वेशभूषा धारण करुन आले होते. मुख्याध्यापक श्री सिनगारे सर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना शिवरायांचे गुण अंगीकारण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री संदीप दांडगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. अनुसया हांडगे मॅडम यांनी केले.