आशाताई बच्छाव
श्री छत्रपती शिवाजी आश्रम शाळेत इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना निरोप…
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 21/02/2025
माहोरा येथील श्री छत्रपती शिवाजी प्रा. व मा.आश्रम शाळेत इ. 10 वी च्या विद्यार्थ्यांना दिनांक 17 फेब्रुवारी रोजी निरोप देण्यात आला. या निरोप समारंभा मध्ये विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेसंबंधी आठवणीना उजाळा दिला. मुख्याध्यापक श्री संदीप सिनगारे यांनी विद्यार्थ्यांना इ. दहावीच्या परीक्षेसाठी तसेच भविष्यातील पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या वेळी कु. अर्चना बकाल, कु. सरला गायकवाड यांनी तर मुलांपैकी विनायक चोरमारे याने आपले मनोगत व्यक्त केले.या वेळी श्री चंदनशिव सर , श्री दांडगे सर , श्री वाघ सर ,कुटुंबरे सर,कु. हांडगे मॅडम, श्रीमती कड मॅडम, श्री संजीव वाघ सर श्री डुकरे, श्री शुभम पंडित,दांडगे मामा आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.