आशाताई बच्छाव
महाराष्ट्र शासनाच्या गाव तिथे ग्रंथालय संकल्पनेतून पारध बु येथील युवकांचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
दैनिक युवा मराठा तालुका प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन तालुक्यातील पारध बू हे गाव या गावाची लोकसंख्या दहा ते अकरा हजार परंतु या ठिकाणी शासनाच्या वतीने कोणतेही वाचनालय ग्रंथालय या ठिकाणी उपलब्ध नाही या या गावातील नवयुवक बाहेरगावी जाऊन अभ्यासिका मध्ये प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षा सारख्या कठीण असणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करतात गावांमध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते असून या गावातील कोणत्याही कार्यकर्त्यांनी या नवयुवकांसाठी समोर येऊन या ग्रंथालयाला चालू करण्यासाठी वाचता फोडण्याचं काम सुद्धा केलेलं नाही या गावातील बरेचशे तरुण अभ्यासाला जागा उपलब्ध नसल्याने व पुस्तिके मिळत नसल्याने नोकरीच्या स्वप्ना पासून सध्या तरी कोसो दूर आहे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकण्यासाठी प्रत्येक नवयुवकांना अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही अभ्यास करण्यासाठी एकांत जागा किंवा ग्रंथालय नाही पालकांचे सुद्धा स्वप्न असतात आपल्या मुलाने अभ्यास करावा त्याला नोकरी मिळावी या उद्देशाने त्याला अभ्यासिक मध्ये प्रवेश देतात भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक हे मोठं गाव असून या गावात अद्याप पर्यंत सुद्धा ग्रंथालय किंवा वाचनालय उपलब्ध झाले नाही या ठिकाणी या अगोदर शासकीय अथवा निमशासकीय ग्रंथालय दाखवून त्यांना मिळणारा निधीचा गैरवापर वापर केला असेल त्याची चौकशी करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी असे नागरिकांकडून बोलल्या जात आहे या ठिकाणी ग्रंथालय सुरू करण्यात यावे करिता सागर देशमुख गजेंद्र लोखंडे शिवाजी लोखंडे श्री जाधव व तसेच इतर तरुणांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे.