आशाताई बच्छाव
वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा तांदूळवाडी ता.भडगाव येथे शेतकरी मेळावा व पाणीवापर संस्था प्रशिक्षण संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पास मुळ प्रशासकीय मान्यता दि.1 मार्च 1999 रोजी मिळाली मात्र सन 2014 पर्यंत प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु होते.
सन 2014-15 मध्ये प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री मा.गिरीश भाऊ महाजन यांनी सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना केल्या व प्रकल्पास 9 मार्च 2018 रोजी द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली.
तद्नंतर प्रकल्पाचा समावेश केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्तपणे अर्थसहाय्यक बळीराजा जलसंजीवनी योजनेमध्ये 1 जानेवारी 2019 रोजी समावेश करण्यात आला. यानंतर खऱ्या अर्थाने धरणाच्या बांधकामाला गती आली. अखेर प्रकल्पांतर्गत असलेल्या मुख्य धरणाचे (बॅरेजचे) काम मार्च 2021 रोजी पूर्ण झाले.
नियोजित क्षेत्र 8290 हेक्टर यामध्ये चाळीसगांव तालुक्याचे 20 गावे 5687 हेक्टर आणि भडगांव तालुक्याचे 11 गावे 2603 हेक्टर क्षेत्र सिंचनासाठी प्रस्तावित आहेत.
वरखेडे-लोंढे बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी पारंपारिक स्वरूपाचा खुला कालवा प्रस्तावित होता.
मात्र यात पाणी गळतीचे प्रमाण लक्षणीय आहे. महाविकास आघाडी सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बंदिस्त पाटचारीचा प्रस्ताव नाकारला व हा प्रकल्प व्यवहार्य नाही असे लेखी पत्र दिले.
मात्र 2022 मध्ये भाजपा सेना महायुती सरकार येताच या प्रकल्पाला तत्काळ मंजुरी मिळाली.
आमच्या मागणीनुसार व शासनाच्या नविन धोरणानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले पाईपलाइन प्रणालीद्वारे सिंचन (PDN) या पर्यायाचा अवलंब करण्यात येत असून येत्या 2 वर्षात केवळ चाळीसगावच नव्हे तर भडगाव तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावर पाणी पोहोचविण्यासाठी
आम्ही सर्व लोकप्रतिनिधी कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते तांदूळवाडी ता.भडगाव येथे वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचा मेळावा व पाणीवापर संस्था प्रशिक्षण प्रसंगी बोलत होते.
यावेळी खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर आप्पा पाटील, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिक्षक अभियंता संतोष भोसले, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळ यशवंत भदाणे, जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्र.2 चे कार्यकारी अभियंता कामेश पाटील, वरखेडे लोंढे उपविभाग शाखा अभियंता किरण तायडे, यांच्यासह बाजार समिती सभापती मच्छिंद्र राठोड, पोपट तात्या भोळे, रावसाहेब पाटील, संतोष भोसले, धर्मा आबा वाघ, संजय तात्या पाटील, डॉ. विशाल पाटील, विकास तात्या पाटील, शेषराव बापू पाटील, सुनील जमादार, मंगेश (मुन्नाबापू) पाटील, सुभाष पाटील, सुनील निकम, नितीन पाटील, बापूसाहेब निकम, नवल पवार, कपिल पाटील, रवींद्र पाटील, साहेबराव राठोड, विजय दिनकर पाटील, सरपंच दीपक चव्हाण, सीमचे उपसरपंच ज्ञानेश्वर महाजन, तुषार चव्हाण, दादाभाऊ पाटील, दिलीप काका चव्हाण, वाल्मीक बोरसे, अनिल पाटील, राहुल पाटील, अनिल महाजन, गिरीश बराटे, काशिनाथ शिरसाठ, सचिन चव्हाण, सोनू भाऊ धनगर, ज्ञानेश्वर चव्हाण, सुरेश महाराज, शिवदास महाजन यांसह वरखेडे धरण लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर शेतकरी मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. सदर बंदिस्त पाटचारी कामात माझा जरी खारीचा वाटा असला तरी यामध्ये सिंहाचा वाटा आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा आहे असे ते म्हणाले.
मेळाव्याला जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिताताई वाघ यांनी उपस्थिती देत शेतकऱ्यांशी संवाद साधला. केंद्रात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व राज्यात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुतीचे डबल इंजिन सरकार असल्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. तापी नदीवर पाडळसरे प्रकल्पाचा भाग सोडला तर आज तापी बारमाही पाण्याखाली आहे, याचप्रमाणे येत्या काळात गिरणा नदी देखील बारमाही प्रवाही ठेवण्यासाठी केंद्र शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.