आशाताई बच्छाव
आंबुलगा येथील ग्रामसेवक कोकनारे यांची बदली न करण्याची मागणी
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज वंटगिरे
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष ग्रामसेवक श्री एस. के. कोकणारे यांची बदली करण्यात येऊ नये. कोकनारे यांनी आंबुलगा येथील ग्रामसेवक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून गावातील अनेक जनतेची कामे मार्गी लागत आहेत, ते गावातील ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सर्व प्रशासकीय कामे वेळेत पूर्ण करतात व कुठल्याही प्रकारची ग्रामपंचायत अंतर्गत कामा संदर्भात नागरिकांची गैरसोय होऊ देत नाहीत तरी अश्या कर्तव्यनिष्ठ ग्रामसेवकाची बदली करू नये अशा विनंतीचे निवेदन आंबुलगा ग्रामपंचायतीच्या वतीने मुखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रामोड साहेब यांना दि. १२ रोजी देण्यात आले. यावेळी सरपंच (प्र) बालाजी रॅपणवाड, उपसरपंच शरद पाटील, ग्रा.प.सदस्य (प्र) राजू कांबळे आदी जणांची उपस्थिती होती.