Home मराठवाडा संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन

संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन

44
0

आशाताई बच्छाव

1001232881.jpg

संत रविदास जयंतीनिमित्त विविध सेवाभावी संस्था, महिला मंडळांच्या वतीने अभिवादन
लातूर / प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे 
संत रविदास जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१२) श्री संत रविदास राष्ट्रीय चर्मकार महासंघ, चर्मकार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या येथील शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात शिवशांती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निडेबन-उदगीर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, वसुंधरा महिला मंडळ उदगीर, लातूर जिल्हा युवक कुणबी मंडळ उदगीर- अतनूर, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने कार्यालयात व मुख्यालयात संत रविदास यांच्या तैलचित्राला शिवशांतीच्या अध्यक्षा चंचलाताई शिवाजीराव हुगे, दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सुनिता बालाजी माने, चंद्रभागा मधुकर वाघमारे, ललिता राम माने, मधुकर उद्धवराव वाघमारे, शिवराज खंडाजी कांबळे, ललिता सूर्यकांत मिंचे, महाराष्ट्र शासननियुक्त ग्राहक संरक्षण परिषदेचे शासन नियुक्त अशासकीय सदस्य बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे, जिजामाता महिला मंडळाचे अध्यक्षा सौ.संध्या बालासाहेब शिंदे अतनूरकर, वसुंधरा महिला मंडळाचे अध्यक्षा सौ. रुक्मीन पांडुरंगराव सोमवंशी, साधुराम ग्रामीण विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या उपाध्यक्षा मयुरी बालासाहेब शिंदे, पत्रकार संजय शिंदे, पत्रकार बालासाहेब गोविंदराव शिंदे यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक वक्ते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष दलित मित्र बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर संत रविदास यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना म्हणाले की, जीवनासाठी दिशादर्शक आहेत संत रविदास यांचे विचार असून आपले जीवन योग्य मार्गावर चालण्यासाठी संतांचे विचार खूप उपयुक्त ठरतात. असेच संत रविदास यांचे विचार आजच्या काळातही जीवनासाठी दिशादर्शक आहेत. संत रविदास जयंती निमित्त त्यांचे हे विचार खुपच प्रेरणादायी आहेत. भारतात अनेक संत होऊन गेलेत. शरीर रुपाने जरी ते नसले तरी त्यांच्या अमुल्य अशा विचारांच्या रुपाने ते आजही समाजाला दिशा देण्याचे काम करत आहे. आज १२ फेब्रुवारी रोजी संत रविदास जयंती आहे. व्या शतकातील भक्तियुगात माघी पौर्णिमेला काशीच्या मंडुआडीह गावातील रघू आणि कर्माबाई यांचे पुत्र म्हणून जन्माला आलेल्या या विभूतीने चर्मकाराचा वडिलोपार्जित व्यवसाय निवडला. पण त्यांनी आपल्या रचनांनी, विचारांनी ज्या समाजाचा पाया रचला तो खरोखरच अद्भूत आहे. चला तर त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे अनमोल विचार. केवळ कोणत्यातरी पूजनीय पदावर बसला आहे म्हणून कोणाचीही पूजा करू नये. जर त्या व्यक्तीमध्ये योग्य गुण नसतील तर त्याची पूजा करू नका. परंतु जर एखादी व्यक्ती उच्च पदावर बसलेली नसून तिच्यात योग्य गुण असतील तर अशा व्यक्तीची पूजा केली पाहिजे. आपण नेहमी आपले कार्य करत राहिले पाहिजे आणि फळ मिळण्याची आशा करु नये. कारण कर्म हा आपला धर्म आहे आणि फळ हे आपले भाग्य आहे. कोणतीही व्यक्ती मोठी किंवा लहान असते ती त्याच्या जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे. माणसाची कृती त्याला उच्च किंवा नीच बनवते. भ्रमात अडकलेला जीव भटकत राहतो. जो हा भ्रम निर्माण करतो तो मुक्तिदाता आहे. स्वतःमध्ये कधीही अभिमानाला जन्म घेऊ देऊ नका. एक छोटीशी मुंगी साखरेचे दाणे गोळा करू शकते पण तेच काम महाकाय हत्ती करू शकत नाही.

Previous articleचाळीसगावात आज केकी मूस स्मारकाचा लोकार्पण सोहळा..
Next articleजिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here