आशाताई बच्छाव
चाळीसगाव येथील घरफोडीतील 2 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- कुटुृंब लग्नाला गेल्याने घर बंद असल्याची संधी साधून घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून बेडरूमधील लाकडी कपाट व पलंगात ठेवलेले सुमारे 14 लाख 94 हजार रूपये किंमतीचा रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज चोरून नेल्याची घटना चाळीसगाव शहरातील शिवाजी चौक, गणेश रोड भागात घडली होती. चाळीसगाव शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या गुन्ह्याचा शिताफीने तपास करून या जबरी घरफोडी प्रकरणी चाळीसगाव बस स्थानकापाठीमागे राहणार्या दोघा चोरट्यांना अटक केली. त्यातील एक आरोपी मध्यप्रदेशातील आहे. त्यांच्या ताब्यातून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 6 लाख 78 हजार 884 रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती अशी की, विजय प्रभूदयाल शर्मा रा. शिवाजी चौक, गणेश रोड हे फर्निचर व्यावसायिक असून दि.1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता पत्नी व मुलांसह ते लग्नासाठी धुळे येथे गेले होते. विवाहसोहळा आटेापून ते दि.4 फेब्रुवाारी रोजी सकाळी 6.30 वाजता घरी आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकुलूप तोडून घरात प्र्रवेश करून बेडरूमध्ये असलेल्या लाकडी कपाट तसेच पलंगामध्ये ठेवलेला 14 लाख 94 हजार रूपयांचा ऐवज त्यात 9 लाख 1 हजार रूपयें रोकड व 5 लाख 95 हजार रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा किेमती ऐवज कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली होती.
याप्रकरणी विजय शर्मा यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला धाव घेत या जबरी चोरीप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 305, 330(1),(2),331(3),(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी हे करीत असतांना या घरफेाडीतील आरोपी हे चाळीसगाव बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या घरात असल्याची माहीती स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे व त्यांचे सहकारी व चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक योगेश माळी व त्यांचे सहकारी यांनी बुधवार दि.12 रोजी पहाटे चाळीसगाव बस स्थानकापाठीमागील घरातून प्रेमसिंग रामसिंग टाक (50) रा. इनपुन पुनर्वास ता. पुनासा जि. खंडवा मध्यप्रदेश व साजनसिंग रूपसिंग टाक (50) रा. बसस्थानक मागे, चाळीसगाव या दोघांना ताब्यात घेतले.
या दोघांना चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आणून त्यांची सखोल चौकशी केली असता आरोपीतांनी शिवाजी चौकातील जबरी घरफोडीची कबुली दिली. पोलीसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1 लाख 3 हजार 754 रूपये किंमतीचे चांदीचे दागिणे, 3 लाख 82 हजार 130 रूपये किेमतीचे सोन्याचे दागिणे व 1 लाख 93 हजार रूपयांची रोकड असा सुमारे 6 लाख 78 हजार 884 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले.दरम्यान चाळीसगाव शहरात यापूर्वी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात या दोघांचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.