Home नांदेड नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप.

नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप.

55
0

आशाताई बच्छाव

1001232719.jpg

नगरपरिषदांच्या अग्निशमन यंत्रणेसाठी ट्रीपल लेअरचे फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 12 फेब्रुवारी :- महसूल व वन विभाग (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन), महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या 72 फायर प्रॉक्झिमिटी सूटचे वाटप आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यामार्फत करण्यात आले.

जिल्ह्यातील देगलूर, उमरी, धर्माबाद, हदगाव, मुदखेड, कुंडलवाडी, बिलोली, कंधार, मुखेड, भोकर, लोहा, किनवट या 12 नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात फायर प्रॉक्झिमिटी सूटचा वापर कसा करायचा याबाबत तज्ञ प्रशिक्षकामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अग्निशमन विभागातील कर्मचारी यांच्या अडचणी जाणून घेतल्या व या सूट सोबतच त्यांना आगीमध्ये बचाव कार्य करताना श्वास घेण्यास त्रास होऊ नये म्हणून भविष्यात त्यांना ब्रीदिंग अपरेटस सेट घेऊन देण्यासंबंधीचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास दिले. तसेच “आगीस प्रतिबंध हेच उत्तम संरक्षण” असल्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांनी याप्रसंगी सांगितले.

या प्रशिक्षण कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका प्रशासन गंगाधर इरलोड, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे पाटील, तहसिलदार (महसूल) विपिन पाटील, तहसिलदार (सर्वसाधारण) शंकर लाड, नगरपालिका प्रशासन विभागाचे अधीक्षक सीताराम गायकवाड पाटील यांच्यासह १२ नगरपरिषदांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleनाशिकमध्ये संत नरहरी सोनार पुण्यतिथी उत्साहात साजरी
Next articleदेगलूर टाइम्स लाईव्ह चे दत्त मंदिरात भव्य शुभारंभ.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here