आशाताई बच्छाव
स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा शाळेचा एन.एम. एम.एस.परीक्षेचा निकाल शंभर टक्के(100%)
जाफराबाद तालुका प्रतिनिधी – मुरलीधर डहाके
दिनांक 12/02/2024
सविस्तर वृत्त असे की जाफराबाद तालुक्यातील स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय बुटखेडा येथील एन.एम.एम.एस.परीक्षा 2024 ला एकूण 82 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. प्रथम क्रमांक सृष्टी ज्ञानेश्वर बनकर 122 गुण, द्वितीय क्रमांक धनश्री गणेशराव सवडे 118 गुण, तृतीय क्रमांक शुभम शालिकराम जगताप 117 गुण या परीक्षेत शंभर पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी ४६ आहे. या परीक्षेमध्ये पात्र ठरणारे विद्यार्थी यांना चार वर्ष दरवर्षी 12 हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. तसेच जवळपास 70 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती मिळणार आहे. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री शंकरराव ढवळे, सचिव प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहे. या यशामध्ये प्राचार्य सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाची योगदान आहे. प्राचार्य तथा सर्व टीमचे संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांनी अभिनंदन करून कौतुक केले आहे .या वर्षी एन.एम.एम.एस.चा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल परिसरातील माता पालक ग्रामस्थ व पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.