Home नांदेड दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू ; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त.

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू ; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त.

30
0

आशाताई बच्छाव

1001226053.jpg

दहावी, बारावी परीक्षेसाठी हेल्पलाईन सुरू ; तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्त.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 10 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. लातूर विभागीय मंडळस्तरावर 10 वी साठी 02382-251633 तर 12 वीसाठी 02382-251733 हा हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

या हेल्पलाईनसाठी नियुक्त केलेले नावे व भ्रमणध्वनी पुढीलप्रमाणे आहेत. कुंभार ए.आर (सहाय्यक सचिव) मो.नं. 9405077991, उच्च माध्यमिक बारावी साठी कारसेकर जे. एस. (व.अ.) मो.नं. 9822823780, डाळींबे एम.यु. (प.लि.) मो.नं. 9423777789, जानकर एच.एस. (व.लि.) मो.नं. 9764409318 आहेत.

माध्यमिक (दहावी) साठी जेवळीकर सी. व्ही. (व.अ.) मो.नं. 9420436482, घटे एस.एच. (प.लि.) मो.नं. 9405486455, सुर्यवंशी ए. एल. (क.लि.) मो.नं. 7620166354 हे भ्रमणध्वनी क्रमांक असतील. विद्यार्थी, पालक व शाळाप्रमुखांनी आपल्या अडीअडचणी विषयी दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत साधावा.

भयमुक्त-तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची नियुक्ती

माध्यमिक व उच्च माध्यमिक प्र. परीक्षा फेब्रु- मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होवून परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे. यासंदर्भात विद्यार्थी-पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार पुढीलप्रमाणे समुपदेशकांशी संपर्क करता येईल. नांदेड जिल्ह्यासाठी समुपदेशकाचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. कच्छवे बी.एम. 9371261500, कारखेडे बी.एम. 9860912898, सोळंके पी.जी. 9860286857, पाटील बी. एच. 9767722071 असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे लातूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी कळविले आहे.

Previous articleलोकाभिमुख प्रशासन निर्माण करणे ही अधिकार्‍यांची जबाबदारी : अभिजीत राऊत
Next articleघानखेडा येथील माजी सैनिक श्री अजबराव लहाने यांची सेवानिवृत्तीबद्दल मिरवणूक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here