आशाताई बच्छाव
रयत शिक्षण संस्थेच्या आदिवासी हायस्कूल पोशेरा येथे शनिवारी दहावीचा शुभचिंतन सोहळा संपन्न झाला पालघर :सौरभ कामडी *************************या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन मा.पांडुरंग बाळू नवले हे होते. या कार्यक्रमासाठी पोशेरा गावचे सरपंच मा.मनोहर नवले,स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य मा.देवराम पाटील , मा.रामचंद्र बदादे, मा.मच्छिंद्रनाथ बदादे,मा.कुणाल काशीद, मा.प्रभाकर शेवाळे, मा.काशिनाथ कचरे,मा.चिंतामण बदादे, मा . पंडित खादे पोशेरा केंद्र शाळेचे मुख्याध्यापक मा.मांगात सर, मा.निरगुडे सर, मा.लिलके सर हे उपस्थित होते त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख मा.पाटील सर यांनीही सदिच्छा भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मा.कापडणीस सर यांनी केले. त्याचबरोबर मा.मच्छिंद्र बदादे, मा.लिलके सर, मा.निरगुडे सर, मा.कुणाल काशीद, मा.जयराम वाघ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.मा.जयराम वाघ यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम तीन क्रमांकासाठी रोख बक्षीसे त्याचबरोबर आपल्या हॉटेल कणसरी वरती जेवणाचे निमंत्रण दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आठवीची विद्यार्थिनी दीक्षा पाटील हीने केले.तीचे कौतुक रोख बक्षीस देऊन मा.जयराम वाघ यांनी केले.आभार प्रदर्शन वर्गशिक्षक जुनघरे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनवणे सर, शेख सर, .कडू मॅडम, जाधव सर . मधुकर नवले यांनी मेहनत घेतली.सर्वांना भोजनाची सोय करण्यात आलेली होती भोजन झाल्यानंतर कार्यक्रमाचे सांगता करण्यात आली.