Home जालना बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

23
0

आशाताई बच्छाव

1001217334.jpg

बहारदार त्रैभाषिक गझल मुशायर्‍यात रसिक मंत्रमुग्ध

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ 

‘मी शब्दांना असे घुसळले की, रक्तामधुनी काव्य उसळले
बहुदा तिचीच चाहूल आहे,  हवेत अत्तर कसे मिसळले.
गझलेच्या वस्तीत राहतो, मी माझ्याच मस्तीत राहतो,
आज काल मी सुगंध होऊन, रसिकाच्या दस्तीत राहतो.’ असे म्हणत प्रसिद्ध गझलकार योगीराज माने यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
जेईएस महाविद्यालयाचा मराठी विभाग तसेच भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद, शाखा जालना यांच्या वतीने आयोजित केलेल्या सातव्या  त्रैभाषिक गझल मुशायर्‍या मध्ये उपस्थित गझलकारांनी एकापेक्षा एक सरस गझला सादर केल्या.
मुशायऱ्याचे उद्घाटन छत्रपती  संभाजीनगर येथील मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्राचार्य आणि माजी अधिष्ठाता डॉ. मजहर फारुकी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध गझलकार डॉ. इक्बाल मिन्ने होते तर  प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या डॉ. अपर्णा पाटील, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, परिषदेचे राज्याध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या गझल मुशायर्‍यात राजेंद्र अत्रे, योगिराज माने, युवराज नळे, जमाल चिस्ती, भागवत घेवारे आणि सुनीता कपाळे या नामवंत गझलकारांनी आपल्या रचना सादर केल्या. गझल मुशायर्‍याचे अध्यक्ष डॉ. इक्बाल मिन्ने यांनी ‘सबको सबकी हर खबर चाहिए , लोग चलती फिरती अखबार क्यूँ है |’अध्यक्ष स्थानावरून याप्रमाणे एकापेक्षा एक सरस गझला सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले.
धाराशिव येथून सहभागी झालेल्या भागवत घेवारे यांच्या ‘पायाखालची घेतील काढून तुझ्या, ते वीट विठ्ठला, जरी वाटले भोळेभाळे, लक्ष ठेव तू नीट विठ्ठला.  या भावगर्भ मराठी गझलेने गझल मुशायऱ्याचा प्रारंभ झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here