आशाताई बच्छाव
रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे बजेट 2025 वर व्याख्यान संपन्न
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव तर्फे बजेट 2025 यावर माहितीपूर्ण व्याख्यान ठेवण्यात आले होते.
त्यासाठी व्याख्याते म्हणून चाळीसगाव येथील चार्टर्ड अकाउंटंट शशिकांत धामणे यांनी मार्गदर्शन केले. वक्त्यांनी बजेट 2025 च्या नवीन तरतुदी विषद केल्या.
करदात्यांनी आपले उत्पन्न घोषित करताना, आपले आयकाराचे विवरण भरणे गरजेचे आहे. त्याचा लाभ करदात्यांनी घ्यावा असे त्यांनी सांगितले, करदात्यांना काही गुंतवणुकीवर कराची सवलत मिळत होती ती आता मिळणार नाही हे त्यांनी विशद केले.
१२ लक्ष रुपयांच्या घसघशीत कर माफ कलमावर सरकारला एक लक्ष कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे
त्यामुळे करदात्यांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे हे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मालपुरे यांनी केले. वक्त्यांचे स्वागत प्रवीण पिंगळे यांनी केले व आभार अकाउंटंट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमास उपस्थित सदस्यांमध्ये चार्टर्ड अकाउंटंट रोटे अनुज देव, रोटे हरीश पल्लन, रोटे संजय चौधरी, रोटे किरण देशमुख, रोटे कांतीलाल पटेल, रोटे बलदेव पुंशी, रोटे निळकंठ पाटील, रोटे प्रितेश कटारिया, रोटे पियुष सोनगिरे, रोटे पंकज पिंगळे, अकाउंटंट असोसिएशनचे सदस्य व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित सदस्य अभय शिरोडे, हेमंत वाणी, विजय तांबे, हरिश्चंद्र पिंगळे, विजय पाटील, सुरेश सोनजे, प्रवीण वाणी, प्रशांत मुलमुले, धनंजय महाजन, ऋषिकेश शिरोडे, अनिल येवले व अमोल गवळी उपस्थित होते