आशाताई बच्छाव
वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ.पालघर :सौरभ कामडी
मोखाडा तालुक्यातील वाकडपाडा हायस्कूल येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वाघ यांनी सांगितले की आपल्या जीवनात दहावी आणि बारावी ची परीक्षा जीवनाला कलाटणी देणारी परीक्षा असते त्यामुळे या परीक्षेत आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन भविष्य घडवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच प्रमुख वक्ते पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगितले व विद्यार्थ्यांना कष्ट मेहनत घेतली तर कुठल्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकता अशा शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा उपसभापती प्रदीप वाघ, प्रमुख वक्ते म्हणून मोखाडा पोलिस निरीक्षक प्रेमनाथ ढोले, जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले, सरपंच लता वारे,
उपाध्यक्ष मिलिंद झोले, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे, स्पार्क फाउंडेशन चे नितीन पिठोले, संचालक चुनीलाल पवार शाळेचे मुख्याध्यापक ठवरे सर इत्यादी पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनया वाघ हिने केले.