Home नांदेड शासकीय सेवा व योजनांचे आज किनवट येथे महाशिबीर.

शासकीय सेवा व योजनांचे आज किनवट येथे महाशिबीर.

59
0

आशाताई बच्छाव

1001214262.jpg

शासकीय सेवा व योजनांचे आज किनवट येथे महाशिबीर.

भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे 9 फेब्रुवारीला उद्घाटन.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवा समिती व तालुका प्रशासन किनवट आयोजक

नांदेड दि. 7 फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांचे आदेशान्वये नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा प्रशासन नांदेड, किनवट तालुका विधी सेवासमिती व तालुका प्रशासन किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने 8 फेब्रुवारी रोजी तालुका क्रिडा संकुल, किनवट जिल्हा नांदेड येथे शासकीय सेवा व योजनांचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकर येथील न्यायालयाच्या विस्तारीत इमारतीचे उद्घाटन न्यायमूर्ती नितीन सुर्यवंशी व न्यायमूर्ती शैलेश ब्रम्हे यांच्या हस्ते होणार आहे.

समाजातील गरजू, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तीला योग्य तो न्याय मिळण्याच्या उद्येशाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणामार्फत राबविल्या जाणा-या योजना व मोफत विधी सेवा, त्याचप्रमाणे शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा तसेच समाजातील अगदी तळागाळातील व्यक्ती सुध्दा या योजनांपासून वंचित राहू नये यासाठी जनजागृती होण्यासाठी या महाशिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

तालुका क्रिडा संकुल किनवट या ठिकाणी दिनांक 8 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11 वा. या महाशिबिराचे उद्घाटन समारंभ होत असून महाशिबीरामध्ये विविध शासकीय सेवा व योजनांचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरीकांनी या महाशिबीराचा मोठ्या संख्येत उपस्थित राहून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सुरेखा कोसमकर प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नांदेड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, नांदेड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती दलजीत कौर जज यांनी केले आहे. तसेच 9 फेब्रुवारीला भोकरी येथील न्यायालयाच्या विस्तरीत इमारतीचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दोन्ही कार्यक्रमाला न्यायमुर्ती शैलेश ब्रम्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

Previous articleअवैद्य तलवार बाळगणाऱ्या आरोपी विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Next articleहाय सिक्युरीटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट वेळेत बसवा आणि दंड टाळा ! प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here