आशाताई बच्छाव
नवोदय प्रवेश परीक्षा काॅपीमुक्त व पारदर्शकपणे घेण्यात यावी….. रुद्राणी फाऊंडेशनची मागणी,
शालेय शिक्षणमंत्री यांना दिले निवेदन
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 10/01/2025
दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी शालेय शिक्षणमंत्री मा ना श्री दादासाहेब भुसे यांची रुद्राणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. जालना जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात येणाऱ्या 18 जानेवारी 2025 रोजी होऊ घातलेल्या नवोदय प्रवेश परीक्षा या ग्रामीण भागातील होतकरु, गरीब व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून विद्यार्थ्यांच्या भविष्यास आकार देणारी आहे. हि परिक्षा काॅपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पडण्यासाठी शिक्षण विभागास आदेशीत करावे अशी मागणी केली.
सदरील नवोदय प्रवेश परीक्षा MPSC, UPSC धर्तीवर घेण्यात यावी. शालेय शिक्षक वगळून इतर विभागांच्या अधिकार्यांची परिक्षा पर्यवेक्षक म्हणून नेमणूक करावी. शिक्षकांच्या नेमणुका केल्यास जिल्ह्याअंतर्गत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येऊ नये. परिक्षा दरम्यान पर्यवेक्षकांना मोबाईल वापराची बंदी घालण्यात यावी. परीक्षेदरम्यान योग्य पोलिस बंदोबस्त देण्यात यावा. सदरील परिक्षा CCTV च्या निगराणी खाली घ्यावी व CCTV चा डेटा सेव्ह करून ठेवण्यात यावा जेणेकरून पालकांच्या तक्रारीनंतर त्या त्या परिक्षा केंद्रावरील CCTV फुटेज तपासुन दोषी अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी. परिक्षेसाठी समावेक्षक म्हणून वर्ग 2 च्या अधिकार्यांची नेमणुक करण्यात यावी. जेणेकरून वर्षभर प्रामाणिकपणे मेहनत आणि अभ्यास करणाऱ्या गरीब होतकरु विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही व खऱ्या गरजवंतांनाच परिक्षेच्या माध्यमातून नवोदय विद्यालयात प्रवेश मिळेल. अशा स्वरूपाचे निवेदन रुद्राणी फाऊंडेशनच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री मा ना श्री दादासाहेब भुसे यांना दिले या निवेदनावर रुद्राणी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा श्री भीमाशंकर आप्पा दारुवाले, उपाध्यक्ष पांडुरंग पा इंगळे, सचिव कैलास आप्पा गबाळे यांचेसह भगवान पा पुंगळे, आत्मलिंग कोमटे, रवी पुंगळे,नामदेव रजाळे साहेबराव पवार, ज्ञानेश्वर बोर्डे, पद्माकर चंदनशिवे, गजानन सानप इ स्वाक्षऱ्या आहेत.
@@@@@@@@@@गोरगरीब खऱ्या गरजवंत गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळेल- भीमाशंकर दारुवाले
काॅपीमुक्त व पारदर्शकपणे परिक्षा घेतल्यास अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना नवोदय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यालयात प्रवेश मिळुन अनेक क्षेत्रांत भविष्यातील दर्जेदार अधिकारी घडतील व भारतीय समाजाला चांगले आणि प्रामाणिक अधिकारी मिळतील यासाठी आम्ही हा प्रयत्न करत आहोत