आशाताई बच्छाव
शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय शिक्षण मंडळासमोर जोरदार निदर्शने.
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 09/01/2025
छत्रपती संभाजीनगर येथे शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने बुधवार दिनांक ०८ जानेवारी रोजी दुपारी विभागीय शिक्षण मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम व जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लक्षवेधी धरणे आंदोलन संपन्न झाले. मराठवाडा शिक्षक संघ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात सातत्याने आंदोलन करीत आहे आज बुधवारी पुन्हा संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपासले. केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, लिपिक, शिपाई, परीक्षक, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर यांचे मानधन वाढविण्यात यावे. 56 वर्ष पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना परीक्षा कामातून सूट द्यावी. स्वयं अर्थासहित शाळेतील शिक्षकांना सुद्धा पेपर तपासणी कामावर घ्यावे. एका शिक्षकास एकाच विषयाच्या प्रश्न उत्तर पत्रिका तपासणीसाठी द्याव्यात. कर्मचाऱ्यांचे परीक्षा सबंधातील मानधन तात्काळ देण्यात यावे आदी मागण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करून आपल्या मागण्याकडे लक्ष वेधून घेतले. आंदोलनानंतर एका शिष्टमंडळाने विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनामध्ये मराठवाडा शिक्षक संघाचे केंद्रीय अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव केंद्रीय सचिव राजकुमार कदम व उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे, जिल्हा सचिव भाई चंद्रकांत चव्हाण, प्रा. डॉ. पुरुषोत्तम जुन्ने, प्रा. डॉ. उमाकांत राठोड, रमेश आंधळे, व्यंकटराव चिलवरवार, कालिदास धपाटे, गणेश आजबे, संजय येळवंते, सय्यद फरकुंद अली, दीपक शेरे, भगवान पालकर, भागवत काकडे, डी.जी.तांदळे, अजय कदम, एन.टी.सोळंके, बी.ए. वऱ्हाड, एच.के.भडके, आर. एम. डोल्हारे, विनोद सवासे,पुरुषोत्तम येडे, प्रभाकर उंबरे, आर. आर. जाधव, प्रल्हाद शिंदे, मोहन शेळके, अशोक ढमढेरे, सविता इंगळे, शितल कवडे, अरुणा चौधरी, संतोष सुरडकर, पद्माकर पगार, गणेश राठोड, दीपक वाघ, बाळू पवार, विलास चंदने, विनोद केणेकर, विलास चव्हाण, नवनाथ मंत्री, आर.आय. शेख, के. एस. गोरे, एस. सी. चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.