आशाताई बच्छाव
भाजपा राष्ट्रीय समर्थक मंचच्या प्रदेशाध्यक्षपदी वसंतराव देशमुख
जाफराबाद प्रतिनिधी-मुरलीधर डहाके
दिनांक 18/12/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, मराठवाड्यातील जालना येथील रहिवासी श्री वसंतराव देशमुख हे मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक चळवळी मध्ये काम करत असताना आपल्या कर्तृत्वातून समाजामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून सेवा व समर्पणाची भावना यासह त्यांची संघटनेसाठी काम करण्याची तळमळ यामुळे भाजपा समर्थक राष्ट्रीय लोक मंचच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्यूमन राईट्स मानव अधिकार मिशन या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय उपाध्यक्ष या पदावर काम करत असतानाच प्रशासकीय पातळीवर सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली पिळवणूक आणि ससेहोलपट तसेच अनेक माध्यमातून होत असलेला भ्रष्टाचार यांना वाचा फोडून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स हयुमन राइट्स मिशनच्या व संघटनेच्या माध्यमातून प्रशासनामध्ये पारदर्शकता व संविधानिक कार्य गतिमान होण्यासाठी काम करत असल्याचे पाहून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती मानव अधिकार मिशनच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर आपल्या कार्यातून रान उठविले आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी सदैव काम करत असल्याचे पाहून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री दीपक श्रीवास्तव राष्ट्रीय संघटक महामंत्री यांनी सामाजिक कार्यकर्ते श्री वसंतराव देशमुख यांना भाजपा समर्थक राष्ट्रीय लोक मंचच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करून त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या या निवडीमुळे राज्यभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आपण यापुढेही या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविणार असून अन्यायाला वाचा फोडण्याचे एक महत्त्वपूर्ण काम करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलतांना दिली.