आशाताई बच्छाव
बीड नगरपालिकेच्या इंजिनिअर वर लाच लुचपतची कारवाई; ०९ लाखाची केली होती मागणी
मोहन चव्हाण
ब्युरो चीफ बीड जिल्हा
बीड दि.१८ डिसेंबर २०२४ येथील नगरपालिकेचे इंजिनियर फारोकी अखिल अहमद यांच्यावर नगर परिषद प्रशासन संचालनालयचे आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आले होते. त्यामध्ये त्यांना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील झाली होती. त्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी ही कारवाई केली आहे. बीड नगरपालिकेतील स्थापत्य अभियंता (अतिरिक्त पदभार सहाय्यक रचनाकार) यांना आणि त्यांचे मदतनीस असलेले खाजगी इसम किशोर खुरमरे यांच्याविरुद्ध बांधकाम परवाना देण्यासाठी ०९ लाख रुपये लाचेची मागणी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात दोघांना अटकही झाली होती. त्या अनुषंगाने राज्याच्या नगरपरिषद संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक कैलास शिंदे यांनी अखिल फारोकी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पुढील आदेशापर्यंत ते निलंबित राहतील, निलंबन कालावधीत फारोकी यांचे मुख्यालय नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय बीड राहील असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.