Home जालना श्रीक्षेत्र गोंदी येथे श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता युवा कौशल्य गुणगौरवाद्वारे तरुणांचा सत्कार

श्रीक्षेत्र गोंदी येथे श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता युवा कौशल्य गुणगौरवाद्वारे तरुणांचा सत्कार

12
0

आशाताई बच्छाव

1001056951.jpg

श्रीक्षेत्र गोंदी येथे श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता
युवा कौशल्य गुणगौरवाद्वारे तरुणांचा सत्कार
श्रीक्षेत्र गोंदी / जालना दिलीप बोंडे ब्युरो चीफ: येथे गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेल्या
श्रीदत्तजयंती महोत्सवाची सांगता अध्यात्मरत्न ह.भ.प. प्रकाश महाराज
गोंदीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. या प्रसंगी महाप्रसाद
घेण्यासाठी गोंदी परिसरातील भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी ग्रामीण भागातील होतकरू व कुशल युवकांना प्रोत्साहन म्हणून
युवा कौशल्य गुण गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. यात गोंदी येथील
प्रगतिशील युवा शेतकरी श्यामसुंदर जगदीश जहागिरदार याचा महात्मा फुले
कृषी विद्यापीठ राहुरी येथून कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान म्हणून
ओळखल्या जाणार्‍या ड्रोन टेक्नॉलॉजीचे विशेष प्रशिक्षण घेवून आल्या बद्दल
विशेष गुणगौरव करण्यात आला. या प्रशिक्षणासाठी जालना जिल्ह्यातील केवळ
दोन युवकांची निवड झाली होती, त्यापैकी गोंदी येथील या युवकाचा निवड झाली
होती असे त्याने मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
तसेच मराठवाडा कीर्तन महोत्सव या उपक्रमा अंतर्गत श्रीक्षेत्र आयोध्या
येथे कीर्तन सेवा व अन्य धार्मिक सेवा देवून आलेल्या ह.भ.प.सुहास पद्माकर
रामदासी यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.श्रीदत्त जयंतीनिमित्त गोंदी
येथील दत्त मंदिरात सामुदायिक दासबोध पारायण, श्रीगुरुचरित्र
अनुष्ठान,विष्णुसहस्त्रनाम- गीतापाठ, दत्तपंचपदी , श्रीमद्भागवत कथा,
नित्य हरिपाठ भजन, मराठवाडा कीर्तन महोत्सव आदी विविध धार्मिक
कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात ह.भ.प. प्रदीप महाराज मुळे
गोंदीकर यांनी श्रीमद्भागवताच्या षष्ठ स्कंधाचे भावपूर्ण विवेचन केले .
तसेच मराठवाडा नारदीय कीर्तन महोत्सवात ह.भ.प. सुहासबुवा रामदासी, ह.भ.प.
योगीराजबुवा मुळे, आदी उपस्थित होते.

Previous articleश्रीधर भोसले ख्रिस्ती समाज पुरस्काराने सन्मानित
Next articleतळा ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री दिलीप ढाकणे यांच्या कन्येचा विवाह सोहळा उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here