Home जालना निधी आणणं हे काम काही सोपं नाही.

निधी आणणं हे काम काही सोपं नाही.

24
0

आशाताई बच्छाव

1001049584.jpg

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ- निधी आणणं हे काम काही सोपं नाही. मंत्रिमंडळाचा अजून विस्तार होणे बाकी असतांनाही आपल्या प्रयत्नांना यश आले आणि 67 कोटी रुपयांचा निधी आपल्याला मिळाला आहे. तूर्तास आपण आज चार रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ केला असला तरी हा कामांचा सिलसिला असाच सुरु राहील, असे मत आ. अर्जुनराव खोतकर यांनी येथे बोलतांना व्यक्त केले. गोरंट्याल यांचा नामोल्लेख न करता यावेळी त्यांनी त्यांच्यावरही टिका केली.
भांडवली गुंतवणूकीसाठी राज्याच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जालना शहरात 67 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने आज आयटीआय पाण्याची टाकी ते मारोती मंदिर चौक (3.49 कोटी), रेल्वे गेट ते माँ किराणा (2.50 कोटी), पेशवे चौक ते लक्कडकोट पुलापर्यंत (1.10 कोटी),  श्रीजी ढाबा ते शंकुतलानगर (2.06 कोटी) या कामाचा आज शनिवारी आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना आ. श्री. खोतकर बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, काही लोकांनी निधीची वाट न पाहताच भूमिपूजन उरकुन घेतले असले तरी आपण तसे करणार नाही. अगोदर निधी मंजूर करुन आणला आणला आणि नंतर भुमिपूजन केले आहे. आज सकाळी प्रथम प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले आणि कामाला सुरुवात केली. आपण आपल्या कामाचा हा सिलसिला असाच सुरु ठेवणार आहोत, मंत्री मंडळ विस्ताराबाबत बोलतांना आ. खोतकर म्हणाले की, मला याबाबत काहीच माहित नाही परंतू आमचे नेते एकनाथराव शिंदे हे जो निर्णय घेतील, तो आपल्याला मान्य राहिल, असेही आ. खोतकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युवा सेनेचे सचिव श्री.अनिरुध्द खोतकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शहर प्रमुख विष्णू पाचफुले, संपर्क प्रमुख पंडीतराव भुतेकर तसेच गणेश सुपारकर, आत्मानंद भक्त आदींसह भाऊसाहेब कदम, बाबासाहेब इंगळे, फिरोजलाला तांबोळी, गणेश मोहिते, दिनेश भगत, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here