आशाताई बच्छाव
जालना शहरामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने पोस्टाच्या पार्सल द्वारे मागविलेली 01 तलवार व 01खंजीर जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 09/ 12/2024
दिनांक 9 /12 /2024 रोजी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगाराची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे संदर्भात विशेष मोहीम राबवणे यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांचे सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निर्माण करून जालना जिल्हा हद्दीतील अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेऊन शोध घेत असताना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे जालना येथील एक व्यक्ती त्याचे नावावर धारदार तलवार व खंजीर पोस्टाद्वारे मागविलेली असून सदर तलवार व खंजीर डिलिव्हरी साठी आज रोजी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती वरिष्ठांना कळवून वरिष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार गांधी चमन पोलीस स्टेशन ऑफिस रेल्वे स्टेशन रोड जालना येथे सापळा रचून गुप्त बातमीदारांनी कळविलेला आरोपी एक खाकी रंगाचा आयताकृती बॉक्स घेऊन जाताना दिसल्याने सदर गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यांस विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव सै. तौशीफ सै.शफीक वय 23 वर्ष राहणार पद्मावती नगर बारवाले कॉलेजच्या पाठीमागे जालना असे सांगितले. त्याच्याकडील खाकी रंगाच्या आयताकृती पुठ्ठ्याच्या बॉक्सची पंचा समक्ष झडती घेतली असता त्यामध्ये 5000/ रुपये किमतीची 01 धारदार तलवार व 1000/ रुपये किमतीचा 01 धारदार पाते असलेला खंजीर मिळून आला. सदरची 01 धारदार तलवार व 01 खंजीर जप्त करण्यात आले असून सदर आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बंसल व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपानी ,मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव, सपोनि श्री योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ, पोलीस हेकॉ.774 पव्हरे,पोलीस हेकॉ 765 वाघ,पोलीस कॉन्स्टेबल 12 42 घुगे, पोलीस कॉन्स्टेबल 857 राठोड, पोलीस कॉन्स्टेबल 897 जैवळ, पोलीस नाईक 1395 पटेल, पोलीस कॉन्स्टेबल 1441 काळे, सर्व जालना व पोलीस स्टेशन कदीम जालना येथील पोलीस हेकॉ. 1253 जायभाये व पोलीस कॉन्स्टेबल 468 पवार यांनी केली आहे.