आशाताई बच्छाव
जालना जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट . मुन्नाभाई डॉक्टर ठरतायत नागरिकांच्या जीवांचा कर्दनकाळ.
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 04/12/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, जालना शहरासह जिल्हाभरात अनेक मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. कुठल्याच प्रकारची आरोग्य विभागाची पदवी नसतानाही व कुठल्याच प्रकारचा अनुभव नसतांना रोग्यांवर उपचार करणारे मुन्नाभाई डॉक्टर बोगस असून जिल्ह्यामध्ये त्यांचा सुळसुळाट पाहावयास मिळत आहे . ही बोगस प्रॅक्टिस म्हणजेच गोरगरीब नागरिकांच्या जीवनाचा कर्दनकाळ ठरत असल्याने अनेक रोग्यांच्या जिवित्वास धोका निर्माण झाला असून याकडे जिल्हा अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची ओरड जनसामान्यातून केली जात आहे.
यामध्ये अनेक मुन्नाभाई बोगस डॉक्टरांकडून जातीपातीचे राजकारण करून लोकांना भडकवण्याचा व समाजा- समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेणाऱ्या मुन्नाभाई डॉक्टरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून नागरिकांच्या जीवावर ही मंडळी उठली असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य जनतेने व्यक्त केल्या आहेत.समाजाचा मुड पाहून राजकारण करायचे आणि त्याच राजकारणाच्या माध्यमातून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न हे मुन्नाभाई बोगस डॉक्टर करतांना दिसतात.परंतु मुन्नाभाई बोगस डॉक्टरांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ मांडला आहे हे मात्र नक्की.यामुळे अनेकांना आपले जीव धोक्यात घालावे लागत आहेत, तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.जालना शहराच्या परिसरातील गाव खेड्यात जाऊन अनेक रोग्यावंर जिवघेणे उपचार केले जातात आणि या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे.काही ठिकाणी तर आपला जीव गमवावा लागला आहे.अशा वेळी मात्र हाच मुन्नाभाई डॉक्टर त्या ठिकाणाहून फरार होतो आणि पुन्हा त्या गावात जात नाहीत अशा अनेक घटना जिल्ह्यात घडत असुन याकडे जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून गुन्हेगार बोगस मुन्नाभाई डॉक्टरांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हाभरात जोर धरू लागली आहे.