आशाताई बच्छाव
मुख्यमंत्री पद शपथविधी समारंभ आझाद मैदान ऐवजी राजभवनात करावा- सुभाष दांडेकर
जालना जिल्हा भीम आर्मीची शहरात बैठक
जालना/प्रतिनिधी दिलीप बोंडे
5 डिसेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा मुंबईत आझाद मैदानाऐवजी राजभवनात करावा अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हाप्रमुख सुभाष दांडेकर यांनी केली आहे.
जालना येथील अंबड रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये भीम आर्मीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भीम आर्मीचे कार्यप्रमुख ड. सुभाष सरोदे, जिल्हा महासचिव वामन दांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष एम.यु. पठाण, जिल्हा मार्गदर्शक शांतीलाल दाभाडे, जिल्हा उपप्रमुख आसाराम पगारे, जालना शहर प्रमुख विठ्ठल कासारे, जालना तालुका प्रमुख अंबादास शेजुळ आदिंची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना सुभाष दांडेकर म्हणाले की, 6 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने चैत्यभुमी येथे लाखो अनुयायांची उपस्थिती अपेक्षीत आहे.
या पवित्र ठिकाणी व महत्वाच्या प्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहे. 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ आजाद मैदान येथे करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र आझाद मैदान हे चैत्यभुमी परिसिरातील गर्दीच्या ठिकाणांच्या जवळ असल्यामुळे तेथे वाहतुक व्यवस्थापन तसेच कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात अडचणी निर्माण होवू शकतात. जर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांवर चुकीचे आरोप ठेवले जाण्याची शक्यता आहे. भिमा कोरेगाव दंगली दि. 01-01-2018) च्या वेळी अशाच प्रकारेच्या प्रशासिक हलजर्गीमुळे परिस्थिती बनली होती. त्यामुळे निरपराध व्यक्तींवर खोट्या एफआयआर नोंदविण्याची शक्यता असते.