आशाताई बच्छाव
पोलीस बॉईज संघटने तर्फे निवडणूक यशस्वीपणे राबविल्याबद्दल निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मीणा यांचे पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन
निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे केले अभिनंदन
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग समन्वय समिती सदस्य राहूल भैया दुबाले यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली येथिल जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले
गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ: पोलीस बाईज संघटना ही सतत महाराष्ट्र पोलिसांच्या हितासाठी व संरक्षणासाठी त्यांच्या कुटुंबीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत शासनाशी लढा देत असून आतापर्यंत शेकडो पोलिसांचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय दिला आहे.
आदिवासी अति दुर्गम व नक्षलग्रस्त अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. याकरिता विशेष परिश्रम घेणारे गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मीना यांचा पोलिस बॉईस सघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदिप पेद्दापल्ली व संघटनेचे पदाधिकारी यांनी भेट घेतली निवडणूक यशस्वीपणे राबविल्याबद्दल यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
निवडणूकिच्या या कार्यकाळात कोणतीही अनूचीत घटना न घडता अत्यंत शांततामय परिस्थिती मध्ये पार पाडण्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना यश आले. यासाठी या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी असणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचेहि विशेष अभिनंदन करण्यात आले.
यावेळी पोलिस बाईज संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदिप पेद्दापल्ली ,जिल्हा उपाध्यक्ष सागर हजारे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरज गुंडमवार, जिल्हा सचिव रोशन कवाडकर,शहर अध्यक्ष अनुराग कुडकावार,जिल्हा सहसचिव हेरिष हकिन ,संतोष पडिहार,मिथून देवगडे महिंद्रा ठाकरे आदि उपस्थित.