Home बीड अंबाजोगाई तालुक्यातील पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अंबाजोगाई तालुक्यातील पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

72
0

आशाताई बच्छाव

1000999914.jpg

अंबाजोगाई तालुक्यातील पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा

बीड/अंबाजोगाई दि: २९ नोव्हेंबर २०२४ अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळ घटना समोर आली आहे. पुस, जवळगाव, ममदापूर परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की पूस जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात बिबट्या दिसला असून त्याने एका शेळीचा फडसा पाडल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चर्चेमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बिबट्याचा वावर निदर्शनात येताच या भागातील ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याची दूरध्वनीवरून कल्पना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून अंबाजोगाईच्या वनपाल विजया शिंगोटे (मॅडम) यांनी त्यांच्या पथकासह पुस, जवळगाव परिसराची पाहणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट्या दिसताच वन विभागाला कल्पना द्यावी असे आव्हान केले. त्यासोबत ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आव्हान त्यांनी केले आहे.

Previous articleबीड जिल्ह्यात ठो ठो आवाज करणाऱ्या बुलेट दुचाकीवर पोलिसांची दणादण कारवाई
Next articleराज्यस्तरीय शालेय सेपाक टाकरा स्पर्धेत जालना जिल्ह्या दुसर्‍या स्थानावर मोहीत मोरेची राज्य संघात निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here