आशाताई बच्छाव
पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- जिल्हयाच्या शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक असलेल्या स्थानिक पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये २२ व २३ नोव्हेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. पहिल्या दिवशी प्राथमिक विभाग वर्ग पहिली ते चौथी तर दुसर्या दिवशी पाचवी ते दहावी या वर्गाच्या खेळ आणि ड्रिल घेण्यात आल्या.
याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री बाकलीवाल विद्यालयाचे एनसीसी अधिकारी अमोल काळे, पोदार ग्रुपच्या नागपूर विभागाचे जनरल मॅनेजर अमन टेमुर्डे, विद्यालयाचे पी.टी.एम मेंबर नितेश भिंगे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली. त्याचबरोबर क्रीडा ध्वज फडकवून आणि मशाल प्रज्वलित करून क्रीडा दिनास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी आनंददायी वातावरणात विविध खेळ घेण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना अमोल काळे म्हणाले की, खेळ हे मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे. खेळामुळे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासासह नियमित खेळाला प्राधान्य द्यावे. कार्यक्रमाच्या यशस्वतीतेसाठी विद्यालयाच्या प्राचार्या सौ. आरती डोमकुलवार, मुख्याध्यापपिका सोनाली दळवी, प्रशासकीय अधिकारी प्रणयसिंग राजपूत, लेखापाल हेमंत सर, एफ. डी. मीनल मॅडम, विद्यालयाचे समन्वयक प्रवीण ठोंबरे, सहसमन्वयक रजनी सावळकर, वैदेही गोखले, कार्यक्रमाधिकारी मीनाक्षी बांगर व विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद यांचे योग्य असे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला पालकांची बहूसंख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.