Home बुलढाणा पॉलिटिक्स ! आजींचा शायराना अंदाज..! ‘मतदान देणं लाईनीत येणं.. वेड्या विचार करतो...

पॉलिटिक्स ! आजींचा शायराना अंदाज..! ‘मतदान देणं लाईनीत येणं.. वेड्या विचार करतो काय? शेळकेबाई उभी आहे रे मशालीले मत देऊन पाय!’

20
0

आशाताई बच्छाव

1000958700.jpg

पॉलिटिक्स ! आजींचा शायराना अंदाज..! ‘मतदान देणं लाईनीत येणं.. वेड्या विचार करतो काय? शेळकेबाई उभी आहे रे मशालीले मत देऊन पाय!’
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– बुलढाणा चेहऱ्यावर सुरकुत्या.. 80
पेक्षा जास्त वय पण सामाजिक जाणीव ठासून भरलेली.. विशाल राजकीय दृष्टिकोन असलेली कणखर बाण्याची आणि शायरी, गाण्याची आवड असलेल्या म्हातारीने जेव्हा शायरी अंदाजातून जनतेला जयश्रीताईंच्या विजयाची साद घातली तेव्हा सभोवताल जमलेल्या लाडक्या बहिणी टाळ्यांचा कडकडाट करताना भारावल्या!

झाले असे की, महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्रीताई शेळके प्रचार करीत होत्या. प्रचारादरम्यान एक आजी जयश्रीताईंच्या जवळ येऊन ठेपली. तिने जयश्री ताईंचे सेवाकार्य यावेळी अधोरेखित केले शिवाय आजीने शायराना अंदाजातून शब्दफुलांची ताईंवर उधळण केली. म्हातारी म्हणाली की,
‘चलती है गाडी उडती है धूल.. शेळकेबाई गुलाब का फुल’ या तारीफेकाबिल ओळींनी अनेकांची चेहरे फुलून गेले होते.

दरम्यान म्हातारीने दुसरी शब्द ओळ फेकली. ‘मतदान देणं लाईनीत येणं.. वेड्या विचार करतो काय? शेळकेबाई उभी आहे रे मशालीले मत देऊन पाय !’ म्हणत जयश्रीताई शेळके यांना विजयी करण्याचे आवाहन केल्याने उपस्थित महिला कार्यकर्त्या व लाडक्या बहिणी भारावून गेल्या होत्या. गावोगावी प्रचार दौऱ्यानिमित्त जयश्रीताईंच्याबद्दलचा जिव्हाळा व्यक्त होत असल्याने त्यांच्या समर्थकांनी जयश्रीताईंचा विजय निश्चित असल्याचा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here