Home गडचिरोली जिल्हयाचा विकास व व जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक संधी द्या आमदार डॉ...

जिल्हयाचा विकास व व जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक संधी द्या आमदार डॉ देवराव होळी

81
0

आशाताई बच्छाव

1000889503.jpg

जिल्हयाचा विकास व व जनतेच्या सेवेसाठी पुन्हा एक संधी द्या

आमदार डॉ देवराव होळी

महायुतीच्या महामेळाव्यात जनतेला आवाहन

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून आ.डॉ. देवराव होळी यांनी भव्य मिरवणुकीसह केले नामांकन दाखल

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीचा महामेळावा व भव्य महारॅली

महायुतीसह आमदार डॉक्टर देवराव होळी यांच्या समर्थकांची प्रचंड गर्दी

गडचिरोली, सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

आपण मागील १० वर्षापासून  गडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या केवळ विकासासाठी प्रयत्न करीत असून मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणारी विकास कामे केलेली आहे. परंतु अजूनही मागास असलेल्या या जिल्ह्याचा मोठा प्रमाणावर विकास होण्याची आवश्यकता आहे त्याकरिता जनतेने मला पुन्हा या जिल्ह्याच्या विकासासाठी व जनतेच्या सेवेसाठी एकदा संधी द्यावी व पुन्हा आमदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी गडचिरोली येथील महायुतीच्या महामेळाव्याप्रसंगी उपस्थित प्रचंड जन समुदायाला मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, सह संपर्कप्रमुख हेमंत जम्बेवार ,भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. तामदेवजी दुधबळे,  लौकिक भिवापुरे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, बंगाली आघाडीचे दीपकजी हलदर, प्रशांतजी भृगुवार, विलास दशमुखे, मारोतराव इचोडकर , शिवसेनेच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख वरगंटीवारताई भाजपाच्या नेत्या प्रतिभाताई चौधरी शहराचे अध्यक्ष कविता ताई ऊरकुडे ,यांच्यासह महायुतीचे नेते प्रामुख्याने उपस्थित होते.

महायुतीच्या महामेळावाला गडचिरोली विधानसभा क्षेत्रातून जनतेने प्रचंड गर्दी करून आमदार डॉक्टर देवराव होळी यांना आपले मोठे जनसमर्थन असल्याचे दाखवून दिले. ढोल ताशांच्या गजरात आदिवासी नृत्य व बैलबंडीच्या जोड्यांनी आजची भव्य मिरवणूक काढून आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या भव्य रॅलीने संपूर्ण गडचिरोली भाजपमय झाल्याचे दिसून आले. आपण मागील दहा वर्षात जनतेच्या कल्याणासाठी विश्रांती न घेता सतत काम केलेले आहे मागील ५० वर्षात कधी न झालेला विकास आपण या १० वर्षात करून दाखवला. आपल्या विकास कामांच्या आधारावर जनता मला नक्कीच पुन्हा एकदा नक्की संधी देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Previous articleराजेंद्र पाटील राऊत यांची संकल्पना नांदगाव मतदार संघाचा विकास हाच आमचा ध्यास
Next articleजळगाव सपकाळ येथे जुगार अड्डाचा सुळसुळाट.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here