Home बुलढाणा ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तातडीने पंचनामे करून...

ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी….

20
0

आशाताई बच्छाव

1000841886.jpg

ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :– बुलडाणा काल 11 ऑक्टोंबर च्या सकाळ पासूनच पाण्याने जोर धरत-धरत दुपारीच पाऊस चांगलाच बरसला, बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात तर राञभर पाऊसाने सतत धार बरसून कहरच केला, त्यामुळे नदी – नाले तुडूंब वाहत राहिले. यामुळे मोताळ तालुक्यातील नळगंगा धरण रात्रीच हाऊस फुल झाल्याने आज सकाळीच संपुर्ण दरवाजे उघडण्यात आले असून नदी काठी असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या पाऊसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके बुडाली तर अनेकांच्या शेतातील विहिरी खचल्या, अनेकांच्या घरात पाणी शिरले एकुणच पावसाने अधिक नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज 12 ऑक्टोंबर रोजी काँग्रेसच्या प्रदेश सचिव अॅड. जयश्रीताई शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून पंचनामे व आर्थिक मदतीसाठी सरकारकडे मागणी रेटली आहे.
जिल्ह्यासह राज्यभरात विविध ठिकाणी जोरदार परतीचा पाऊस झाला. मोताळा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. यामध्ये अनेक शेतातील विहिरि खचल्या. मका, सोयाबीन, कापूस व तूर ही पिके पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
आज शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी काही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचल्याचे दिसले. त्यापैकी पहिले नाव म्हणजे काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके ह्या आहेत. त्यांनी मोताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पिकांची पाहणी केली असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सरकारकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here