Home भंडारा आई-वडिलांना मानसन्मान द्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांचे प्रतिपादन

आई-वडिलांना मानसन्मान द्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांचे प्रतिपादन

36
0

आशाताई बच्छाव

1000825437.jpg

आई-वडिलांना मानसन्मान द्या
समाज प्रबोधन कार्यक्रमात ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांचे प्रतिपादन

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )दिनांक 5 ऑक्टोबर 2024 ला कोरंबी( गणेशपुर भंडारा) या ठिकाणी माननीय सूर्यभान हुमणे उपमहासचिव कास्ट्राईब संघटना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ग्यानचंद जांभुळकर समाजप्रबोधनांमध्ये म्हणाले की ,प्रत्येक व्यक्तीने आई-वडिलांचा मान सन्मान राखायला पाहिजे.
कोरंबी येथे मिथुन मेश्राम यांच्या आई वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त ते कार्यक्रमात बोलत होते ते पुढे म्हणाले की ,आई-वडिलांनी आपल्याला जग दाखवलेला आहे .लहानाचा मोठा केलेला आहे .त्याचप्रमाणे आपल्या महापुरुषांचे सुद्धा आपल्यावर फार मोठे उपकार आहेत .आई-वडिलांनी आपल्याला जन्म दिला पण खरे माणसं आम्हाला आमचे महापुरुष यांनी बनवलेले आहे .
आपल्या तीन तास चाललेल्या कार्यक्रमात जांभूळकर पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्व काही दिले आहे. हातचं काहीही राखून ठेवलेलं नाही. बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षणाशिवाय आपणास उपाय नाही .
अंधश्रद्धेवर प्रहार करताना जांभूळकर म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला विज्ञानवादी धम्म दिला . तथागत बुद्धाने अडीच हजार वर्षाच्या पूर्वी देव ईश्वर ,आत्मा, भूत ,भानामती, लावडीन ,चेटकिन, मंत्र तंत्र, जादु टोणा नाकारलेला आहे. म्हणून तुम्ही नकली बुवा ,बाबा, बापू, हापू , टापु खिसेकापू यांच्या नादी लागू नका .श्रमाचा आणि घामाचा पैसा बरबाद करू नका. बुवाबाजी प्रूफ करताना त्यांनी काही वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले. हातावर कापूर जाळणे व ते जिभेवर ठेवणे , जिभे मधून सायकलचे स्पोक आरपार काढणे, तांदळाने भरलेला लोटा चाकूने उचलने, लिंबू मधून रक्त काढणे, चिट्ठीकाणाला लावून चिठीतले नाव ओळखणे इत्यादी
कार्यक्रमाला प्रचंड गर्दी उसळली होती तीन तास प्रेक्षक खिळून बसलेले होते कोणीही उठलेले नाही जांभूळकर यांना प्रियाताई शहारे, बब्बूमिया शेख, प्रभाकर तेलंग, गिरीश महाजन यांनी साथ दिली प्रियाताई शहारे यांनी सुद्धा बौद्ध बांधवांचे प्रबोधन केले .आभार मिथुन मेश्राम यांनी मानले.

Previous article१५ दिवसाच्या गोंडस मुलीला सोडून देऊन आई गेली पळून !
Next articleएकात्मिक शेती शाश्वत शेती –अजयकुमार राऊत प्रकल्प उपसंचालक आत्मा,भंडारा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here