Home बुलढाणा १५ दिवसाच्या गोंडस मुलीला सोडून देऊन आई गेली पळून !

१५ दिवसाच्या गोंडस मुलीला सोडून देऊन आई गेली पळून !

32
0

आशाताई बच्छाव

1000825420.jpg

१५ दिवसाच्या गोंडस मुलीला सोडून देऊन आई गेली पळून !
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलडाणा :- देऊळगाव राजा तालुक्यातील टाखरखेड भगिले येथे १५ दिवसांच्या बाळाला सोडून अज्ञात मातेने पलायन केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी देऊळगाव पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाळाला स्त्री रुग्णालय जालना येथे दाखल करण्यात आले आहे. टाकरखेड भगिले येथे एका घरासमोरील अंगणात १५ दिवसांचे जिवंत स्त्री जातीचे बाळ २ ऑक्टोबर रोजी पहाटे अज्ञात महिलेने टाकून पळ काढला. याविषयी पोलिस पाटील नारायण दहातोंडे यांनी पोलिसांना माहिती दिली.
त्यावरून पोलिसांनी लगेच घटनास्थळी भेट देऊन तेथे जमलेल्या लोकांना ते बाळक कोणाचे आहे याबाबत विचारपूस केली असता उपस्थित असलेल्यांचे नसल्याचे समोर आले. पोलिसांनी बाळाला देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी स्त्री रुग्णालय ‘जालना’ येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल कलिम देशमुख करीत आहे.

Previous articleअवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..
Next articleआई-वडिलांना मानसन्मान द्या समाज प्रबोधन कार्यक्रमात ग्यानचंद ताराचंद जांभूळकर यांचे प्रतिपादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here