Home बुलढाणा अवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..

अवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..

18
0

आशाताई बच्छाव

1000825418.jpg

अवघ्या 24 तासाच्या आत मोबाईल चोरट्यांच्या बुलडाणा शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या..
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलडाणा चोर कितीही शातीर असला तरी, पोलिसांच्या पकड मध्ये येतोच! असाच एक मोबाईल चोर पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद केला आहे.मोबाईल शॉपी फोडून मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्यांना शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासाच्या आत गजाआड केले आहे. 5 ते 6 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री बस स्टॅन्ड परिसरात असलेल्या माऊली मोबाईल शॉपी या दुकानात चोरट्यांनी हात साफ केला होता. यामध्ये काही मोबाईल हेडफोन चार्जर असा बराच मुद्देमाल नगदी 18 हजार रुपये असा एकूण 34000 रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला होता. चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अवघ्या 24 तासाच्या आत गोपनीय माहितीद्वारे आरोपींना शिताफीने पकडले. या घटनेमध्ये 5 आरोपींचा समावेश आहे. यामध्ये एक आरोपी हा अल्पवयीन आहे.
पकडण्यात आलेले आरोपी भागवत गोविंद राऊत वय 21 वर्ष रा उदयनगर, ऋषिकेश शालिकराम जाधव वय वर्षीय रा उदयनगर, आकाश रामदास काळे वय 22 वर्षे रा उदयनगर, अनिकेत नारायण हरकल वय 25 वर्षीय रा सागवान तर एक आरोपी हा अल्पवयीन आहे असे या चार आरोपीसह एक अल्पविन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ शशिकांत धारकरी, पो.कॉ. युवराज शिंदे, पो. कॅ विनोद बोरे, ना.पो.कॉ. सुनील मोजे, पो. कॅ. गणेश टेकाळे, चालक शेख रहीम यांनी ही कारवाई केली आहे.

Previous articleवाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने ऑटोला उडवले ! -4 जण गंभीर !
Next article१५ दिवसाच्या गोंडस मुलीला सोडून देऊन आई गेली पळून !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here