Home विदर्भ केळीचे बाजार बाराशे ते सतराशे रुपये शेतकरी खरेदी पण मार्केटमध्ये खुल्ले फ्रुट्...

केळीचे बाजार बाराशे ते सतराशे रुपये शेतकरी खरेदी पण मार्केटमध्ये खुल्ले फ्रुट् विक्रीत त्याकडून ग्राहकाची लूट

28
0

आशाताई बच्छाव

1000822194.jpg

केळीचे बाजार बाराशे ते सतराशे रुपये शेतकरी खरेदी पण मार्केटमध्ये खुल्ले फ्रुट् विक्रीत त्याकडून ग्राहकाची लूट
श्रावण महिन्यापासून केळी पिकाला बाजारामध्ये मोठी मागणी असते त्यावेळेस पासून सुरू असलेल्या महालक्ष्मी गणपती दसरा दिवाळी काळात केळीला मार्केटमध्ये मोठी मागणी ग्राहकाकडून होत असते अशाच अवस्थेत आज रोजी मार्केटमध्ये केळीचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे एकंदरीतच 3500 रुपयापासून 4000 हजार रुपये पर क्विंटल पर्यंत पोहोचलेले केळीचे दर आज रोजी 1200रुपये क्विंटल ते 1700 रुपये क्विंटल वर आले आहेत पण ह्या दराच्या तुलनात्मक विचार केला तर आज रोजी मार्केटमध्ये आजही खुल्या बाजारात फ्रुट किरकोळ विक्रेत्याकडून ग्राहकाची मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.
एकंदरीत ग्राहकाला पन्नास रुपये पासून सत्तर रुपये पर डझन केळीची विक्री मार्केटमध्ये खुल्या बाजारामध्ये सुरू आहे त्यामुळे ग्राहकाच्या खिशाला मात्र केळी खरेदी करताना चांगली झळ बसत आहे पण बारा महिने पिकाची देखभाल करून महागड्या दराने खते विकत घेऊन पिकाला देताना मोठे पैसे मोजावे लागले आहेत तर मागील वर्षात मार्च महिन्यापासून जून महिन्यापर्यंत उष्णतेची मोठी लाट होती या अवस्थेत केळी पिकाची देखभाल करणे केळी बागायतदार शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागली होती त्या अवस्थेत केळी पिकांना पाण्याचे व्यवस्थापन करणे अवघड बनले होते अशा परिस्थितीत केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आपली बाग तारेवरची कसरत करून पिकवली असताना आज रोजी मार्केटमध्ये केळीच्या दरात 50 ते 60 टक्क्याने घसरन झाल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात आज रोजी अश्रू पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांच्या केळी मात्र कवडीमोल किंमतीत जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटक सहन करावा लागत आहे.
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली

Previous articleनाशिकला मनु मानसी संस्थेचा पुरस्कार सोहळा संपन्न
Next articleइथेनाईल मॅन्युफ्रॅक्चरर्स असोशियन ऑफ इंडिया संस्थेच्या संचालक पदी दांडेगावकर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here