Home नांदेड मुक्रमाबाद येथे सरस्वती बहुद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा...

मुक्रमाबाद येथे सरस्वती बहुद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

17
0

आशाताई बच्छाव

1000819106.jpg

मुक्रमाबाद येथे सरस्वती बहुद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने तालुकास्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न

मुखेड युवा मराठा न्युज नेटवर्क बस्वराज स्वामी वंटगिरे

मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे सरस्वती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था च्या वतीने, श्री छत्रपती शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय मुक्रमाबाद येथे दि (५) आक्टोबर शनिवार रोजी तालुकास्तरीय शिक्षक सन्मान व सेवापूर्ती सोहळा संपन्न झाला. मुखेड तालुक्यातील 155 शिक्षक, शिक्षिका आणि 20 सेवा निवृत्त शिकाकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव माजी सनदी अधिकारी बालाजी पाटील खतगावकर, माजी शिक्षण सभापती व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माजी सभापती अशोक पाटिल राविकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे उद्घाटक बालाजी पाटील खतगावकर म्हणाले, माझ्या जीवनात शिक्षकांचा मी खूप मोठ्या प्रमाणात आदर करतो. सर्व सामान्य नागरिकांसह, शिक्षकांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन, कोणते ही कर्म मनातून आवडीने सत्य रूपाने जर केलं तर देव त्याची परतफेड करेल, त्याचा आनंद आपणास मिळतो. कोणाचे केव्हा, कुठे, काय होईल याची आपण कल्पना करू शकत नाही. मी मुखेड- कंधार मतदार संघाचा शंभर टक्के उमेदवार असुन निवडणुकीच्या मैदानात असल्याचे सांगितले. तालुक्याचा जर विकास बघितला तर दुःख वाटतं येथील लोकप्रतिनिधी सभागृहात जात नसल्याचे सांगत. विद्यमान आमदाराचे नाव घेण्याचे टाळले. प्रसंगी विद्यमान आमदारांना चिमटे काढले. रेनापुर – उदगीर – मुक्रमाबाद- सगरोळी या राष्ट्रीय महामार्ग मंजुर करून आणल्याचे सांगितले. तसेच मुखेड एम आय डी सी चा प्रश्न आपल्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे सांगितले. सध्या मी ग्रामीण भागात फिरत असून लोकांचा प्रचंड प्रतिसाद असल्याचे खतगावकर म्हणाले.
शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून सुज्ञ नागरिक घडवणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. मजबूत लोकशाही निर्माण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे सांगत बालाजी पाटील खतगावकर यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहण्याचे आवाहन गोजेगावकर यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्य शिक्षक शिक्षिका उपस्थीत होते. काही काळ पावसाच्या आगमनामुळे कार्यक्रमाला व्यत्यय आल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर हे होते. याप्रसंगी युवा नेते बबन पाटील गोजेगावकर , शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटिल कबनुरकर, सुरेश सावकार पंदीलवार, श्रीकांत काळे, हणमंत मामा वाडीकर, सुभाष आप्पा बोधणे, दिगंबर पाटील गोजेगावकर, प्रकाश कुंडगिरे, तमाप्पा गंदीगुडे, राजू आप्पा देवणे, बाबू नाईक कलंबरकर, सरपंच खतगाव जयराम बाचे पाटील, राहुल सिगरे, शंकराप्पा खंकरे, जळबाजी गुमडे, काशिनाथ इंदुरे सह आदी नागरीक शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here