Home गडचिरोली 13 ऑक्टोंबर ला विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील 15 वर्षाखालील क्रिकेट( मूले...

13 ऑक्टोंबर ला विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील 15 वर्षाखालील क्रिकेट( मूले ) (मूली) निवड चाचणी।

45
0

आशाताई बच्छाव

1000818234.jpg

13 ऑक्टोंबर ला विदर्भ क्रिकेट संघटनेद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील 15 वर्षाखालील क्रिकेट( मूले ) (मूली) निवड चाचणी।

गडचिरोली सुरज गुंडमवार ब्युरो चीफ 

गडचिरोली: विदर्भ क्रिकेट संघटना नागपूर द्वारे आयोजित विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण विभागातील शाळेमधील प्रतिभावंत खेळाडूचा शोध घेण्यासाठी व त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये विदर्भ क्रिकेट संघटना तर्फे निवड चाचणी घेण्यात येणार आहे.या निवड चाचणीसाठी फक्त शाळेमधील 15 वर्षाखालील (मूल /मूली) खेळाडूसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.या निवड चाचणीसाठी नागपूर येथून विदर्भ क्रिकेट संघटनेचे निवड समितीचे सदस्य येणार आहेत, हे निवड चाचणी करताना कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क किंवा फी आकारण्यात येणार नाही याची नोंद जिल्ह्यातील खेळाडू व शाळांनी घ्यावी.

गडचिरोली जिल्ह्यातील शाळेच्या प्राचार्य / मुख्याध्यापक यांना सविनय कळविण्यात येत आहे की आपल्या शाळेतील इच्छुक क्रिकेट खेळाडूंची(मूल/ मूली) यादी शाळेच्या लेटर पॅडवर शाळेच्या क्रीडा शिक्षकाचे नाव व त्यांचा मोबाईल क्रमांक सह खेळाडूचे नाव, जन्मतारखे सह बोनाफाईट प्रमाणपत्र सोबत जोडून गडचिरोली जिल्हा क्रिकेट संघटना सदस्य( प्रशांत भूपाल, श्री आशिष बावनकुळे, श्री सचिन मडावी, श्री अनिल कल्कोत्वर) यांच्याकडे दिनांक 10/10/2024 पर्यंत जमा करावे.

तरी वरील नीवड चाचणीसाठी सर्व शाळांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन विदर्भ संघटना नागपूर जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री शरद पाध्ये , गडचिरोली जिल्हा क्रिकेट संघटनेचे जिल्हा संयोजक मंगेश देशमुख यांनी केले आहे.

निवड चाचणी खालील वयोगटातून करण्यात येईल, 15 वर्षाखालील खेळाडू 1/09/2009। अंतर जन्मलेले व 31/08/2011 च्या पहिले वयोगट फक्त 13 ते 15 वयोगट

Note:( निवड चाचणीची तारीख 13/10/2024 व वेळ 09:00 निवड चाचणीचे ठिकाण गडचिरोली जिल्हा स्टेडियम)( पांढरा गणवेश आणि खेळाडूचे स्वतकिट( क्रिकेट किट) साहित्य आणावे.

महत्त्वाचे कागदपत्रे( आधार कार्ड , संगणकीकृत जन्म प्रमाणपत्र)

प्रशांत भूपाल 9834558529 आशिष बावनकुळे 9860597252 अनिल कल्कोत्वर 8275716949 सचिन मडावी 9421786973

Previous articleगोखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या उपोषणाला पाचव्या दिवशी राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांची भेट
Next articleदहन अवगुणांचा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here